घरनवी मुंबईवाशीमध्ये रंगणार आज आपलं महानगर महागौरव पुरस्कार सोहळा!

वाशीमध्ये रंगणार आज आपलं महानगर महागौरव पुरस्कार सोहळा!

Subscribe

पनवेल : मराठी वृत्तपत्रसृष्टीत 35 वर्षांपासून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक ‘आपलं महानगर’ च्या रायगड आवृत्तीच्या वतीने आज मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता विविध क्षेत्रातील गुणवंत, कर्तृत्ववान व्यक्तींना ‘महागौरव 2023’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तमाम वृत्तपत्रसृष्टीचे लक्ष लागलेल्या या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. (My Mahanagara Mahagaurav award ceremony will be held in Vashi today)

याशिवाय ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ फेम लोकप्रिय मराठी अभिनेता संदीप पाठक, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री अक्षया नाईक, तसेच विधानसभेचे सदस्य गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे आणि प्रशांत ठाकूर, कोकण विभागाचे आयुक्त महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर 6 मधील साहित्य मंदिरमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला निमंत्रितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दैनिक ‘आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत, तसेच रायगड आवृत्तीचे निवासी संपादक विजय बाबर यांनी केले आहे.

पुरस्कारांचे मानकरी

डॉ. प्रतीक तांबे आणि डॉ. विजया तांबे (वैद्यकीय क्षेत्र), डॉ. सचिन लोखंडे (वैद्यकीय), विजयकुमार पोटदुखे (अभियांत्रिकी), भार्गव पाटील (नौकानयन), आयन एक्स्चेंज इंडिया लिमिटेड (उद्योग), अनुजा पाटील साकोळकर (शैक्षणिक), आस्मा सय्यद (मालमत्ता खरेदी-विक्री), सुनील शिंदे (सामाजिक), कै. शिवराम ढुमणे (धैर्य), राजाभाऊ कोठारी (सामाजिक), विशाल पाटील (डिजिटल मार्केटिंग) आणि डॉ. हीना सामानी (सामाजिक), नीलम आंधळे (सामाजिक), अनिता कोलते (सामाजिक), डॉ. शर्वरी पाटणे (उद्योग), वृषाली मगदूम (सामाजिक).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -