घर महाराष्ट्र 'माझ्या पप्पांनी गणपती आणला'; रातोरात स्टार झालेला चिमुरडा कोण आहे? जाणून घ्या

‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’; रातोरात स्टार झालेला चिमुरडा कोण आहे? जाणून घ्या

Subscribe

माझ्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर इंस्टाग्राम रिल्सवर त्याने जो काही परफॉर्मन्स दिला आहे तो अप्रतिम आहे. आपल्या चेहऱ्यावरील गोड भाव आणि त्याची निरागसता सध्या सर्वांनाच मोहिनी घालत आहे. साईराज केंद्रे असे या चिमुरड्याचे नाव असून अवघ्या दीड वर्षांपासून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबीयांकडून शेअर करण्यात येतात.

आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपतीचं आगमन आता अवघ्या काही दिवसांत होणार आहे. या दिवसांमध्ये विविध प्रकारचे देखावे आपल्याला पाहायला मिळतात. त्याची तयारी ही काही महिन्यांपासून करत असतात गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ ही प्रत्येकाला असते. अशाच प्रकारची बाप्पाच्या आगमनाची ओढ असलेल्या एका चिमुकल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये चार वर्षांचा चिमूकला ‘ आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर एक्टिंग करताना दिसत आहे. हे पाहून तुम्हाला हा मुलगा कोण आहे? आणि तो रातोरात स्टार कसा झाला, असे अनेक प्रश्न पडले असतील.  त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. (My papa brought Ganapati Who is the kid who became an overnight star Sairaj Kendre )

माझ्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर इंस्टाग्राम रिल्सवर त्याने जो काही परफॉर्मन्स दिला आहे तो अप्रतिम आहे. आपल्या चेहऱ्यावरील गोड भाव आणि त्याची निरागसता सध्या सर्वांनाच मोहिनी घालत आहे. साईराज केंद्रे असे या चिमुरड्याचे नाव असून अवघ्या दीड वर्षांपासून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबीयांकडून शेअर करण्यात येतात. साईराज हा बीड जिल्ह्यातील कान्हेरवाडी गावचा रहिवासी असून सध्या तो अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकतो आणि त्याच शाळेच्या युनिफॉर्मवर त्याने माझ्या पप्पांनी गणपती आणला हा व्हिडीओ बनवलेला आहे. साईराजचे वडील गणेश केंद्रे हे त्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात.

- Advertisement -

साईराज याचे कुटुंबीय या आधीपासून म्हणजेच साईराज दीड वर्षांचा असल्यापासूनच Tiktok वर त्याचे व्हिडीओ शेअर करत होते. Tiktok देशातून हद्दपार झालं आणि त्यानंतर मग त्यांनी इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडीओ पोस्ट करायला सुरूवात केली. tiktok वर साईराजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आई मला पावसात जाऊ दे, या व्हिडीओनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

माझ्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं पाहिल्यानंतर साईराज याने या गाण्यावर स्वत:चं रिल्स बनवण्याचा आपल्या वडिलांकडे आग्रह केला आणि त्याच्या वडिलांनी हा व्हिडीओ तयार करून इस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर मात्र हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. अवघ्या चार वर्षांच्या साईराजचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावानं सगळेच मोहित झाले आहेत. लहानशा साईराजचे सध्या जोरदार कौतुक केले जात असून मूळ गाण्यापेक्षा देखील जास्त प्रमाणात हा व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचलेला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: ‘या’ घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल )

- Advertisment -