घरमहाराष्ट्रकोल्हापूर खंडपीठासाठी माझा जाहीर पाठिंबा - न्यायमूर्ती भूषण गवई

कोल्हापूर खंडपीठासाठी माझा जाहीर पाठिंबा – न्यायमूर्ती भूषण गवई

Subscribe

कायद्याने चालणारे राज्य म्हणून आपल्या देशात लोकशाहीचे राज्य आहे. मात्र अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती जनतेला असतेच असं नाही. म्हणूनच आपल्या देशातील जनतेला नवनवीन कायदे, बदलणारे कायदे व बदलणार्‍या कायद्याचे अर्थ याबाबतची माहिती असायला हवी आणि ती जनतेपर्यंत पोहोचायला हवी, त्याची जबाबदारी सर्व वकील वर्गाने घ्यायला हवी, असेही मत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केले.

कोल्हापूरः नागरिकांना न्यायदानाचे काम जलदगतीने आणि कमी खर्चात द्यायचे असेल तर विकेंद्रीकरणाची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी कोल्हापूर खंडपीठाची येथील वकील वर्ग आणि बार कौन्सिलची मागणी रास्त आहे. म्हणूनच कोल्हापूर खंडपीठासाठी माझा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस भूषण गवई यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या क्लेप कार्यक्रमात बोलताना केले. तसेच बदलते कायदे बदलत्या संदर्भानुसार कायद्यांचे बदलते अर्थ आणि संपूर्ण कायद्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देशातील वकील वर्गाची असल्याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक, सिंधुदुर्ग सुपुत्र न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, सर्वोच्च न्यायालयाचे विशेष सरकारी वकील शेखर नाफडे, महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकिल पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, इंडियन बार असोसिएशनचे सदस्य ज्येष्ठ वकील जयंत जायभावे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अरविंद आव्हाड, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड संग्राम देसाई, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड दिलीप धारिया, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड राजेंद्र रावराणे, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन राज्यभरातील सर्व सदस्य सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यातील वकीलवर्ग आणि जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

कायद्याने चालणारे राज्य म्हणून आपल्या देशात लोकशाहीचे राज्य आहे. मात्र अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती जनतेला असतेच असं नाही. म्हणूनच आपल्या देशातील जनतेला नवनवीन कायदे, बदलणारे कायदे व बदलणार्‍या कायद्याचे अर्थ याबाबतची माहिती असायला हवी आणि ती जनतेपर्यंत पोहोचायला हवी, त्याची जबाबदारी सर्व वकील वर्गाने घ्यायला हवी, असेही मत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केले.

नांदोस हत्याकांडात आरोपींना शिक्षा मिळवून देणारे कुडाळचे अॅड श्रीकृष्ण उर्फ अजित नारायण भणगे, अॅड अजित पांडुरंग गोगटे, अॅड प्रकाश देवराव परब, पहिले सरकारी वकील अॅड विलास राधाकृष्ण पांगम, अॅड सुभाष गोपाळ पणदूरकर व अॅड प्रकाश शंकर रानडे या सिंधुदुर्गातील सहा ज्येष्ठ वकिलांचा सत्कारही मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला एका न्यायदानाच्या गौरवाची पोहोच दिली गेली.

- Advertisement -

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड उमेश सावंत व अॅड विलास परब यांनी केले, तर प्रास्ताविक अॅड संग्राम देसाई यांनी केले. आभार अॅड राजेंद्र रावराणे यांनी मानले. कोल्हापूर खंडपीठाच्या अनेक वर्षाच्या मागणीबाबत आणि बार कौन्सिलच्या पाठपुराव्याबाबत अॅड संग्राम देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात मान्यवरांचे लक्ष वेधले. वकील वर्गाच्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या या सोहळ्याचे आणि मार्गदर्शन चर्चासत्र कार्यक्रमाबाबत अनेक मान्यवर न्यायमूर्तींनी अॅड संग्राम देसाई यांचे विशेष कौतुक केले.

कोल्हापूर खंडपीठासाठी माझा जाहीर पाठिंबा – न्यायमूर्ती भूषण गवई
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -