घरमहाराष्ट्रमाझ्या भूमिका स्पष्ट आहेत; राज ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

माझ्या भूमिका स्पष्ट आहेत; राज ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

Subscribe

मनसे आणि भाजप युती होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. यावर विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी परप्रांतियांबद्दलच्या भूमिका स्पष्ट कराव्या असं म्हटलं होतं. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या भूमिका स्पष्ट आहेत म्हणत फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिका स्पष्ट कराव्या असं गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं. यावर बोलताना राज ठकरे यांनी भूमिका काय स्पष्ट करायच्या. माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. माझ्या भाषणात मी वेडावाकडा विचार नाही करत. मी आज पर्यंत ज्या काही भूमिका मांडल्या त्या स्पष्ट आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत. त्यामध्ये देशहिताच्या गोष्टी देखील मी मांडल्या आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवलेली नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंनी भाषणाच्या क्लिप पाठवल्याची माहिती दिली. मात्र, राज ठाकरेंनी हा दावा फेटाळला आहे. मी चंद्रकांत पाटील यांना कोणतीही क्लिप पाठवलेली नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मी बोललो होतो क्लिप पाठवेन, पण मी पाठवली नाही. त्यांना कोणी पाठवली माहिती नाही. मी त्यांना विचारेन कोणी क्लिप पाठवली, असं राज ठाकरे म्हणाले.

पुरंदरेंनी इतिहासाला धक्का लावलेला नाही

राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं. त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत, अशा शब्दात बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -