Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'मराठा आरक्षण हाच माझा उपचार' ; जरांगे पाटलांचं राजकीय पक्षांना आवाहन ...

‘मराठा आरक्षण हाच माझा उपचार’ ; जरांगे पाटलांचं राजकीय पक्षांना आवाहन म्हणाले…

Subscribe

माझा उपचारच मराठा आरक्षण आहे. सोबतच त्यांनी राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की मराठा समाजानं 70 वर्षे या राजकीय पक्षांना भरभरून दिलं आहे, आता त्यांची वेळ आहे. त्यांनी मराठ्यांसाठी आरक्षण मिळवून द्यावं, असंही जरांगे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मागच्या 14 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान त्यांच्यात आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठका या फोल ठरताना पाहायला मिळत आहेत. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्या या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत तर सरकारही त्यांच्याकडून यासाठी महिन्याभराचा कालावधी मागत आहे. आता यावर सर्व पक्षीयांची एक बैठक देखील मंत्रालयात सुरू आहे. यातच जरांगे पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. (My Treatment is Maratha reservation Manoj Jarange Patil on Maratha Reservation)

मनोज जरागे पाटील यांच्या उपोषणावर मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत कोणतंही ठोस आश्वसन दिलं जात नसल्याचं त्यांचं म्हणण आहे. आता जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आणि ते कोणत्याही प्रकारचा उपचार घेत नाहीत, त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, माझा उपचारच मराठा आरक्षण आहे. सोबतच त्यांनी राजकीय पक्षांना आवाहन केलं आहे की मराठा समाजानं 70 वर्षे या राजकीय पक्षांना भरभरून दिलं आहे, आता त्यांची वेळ आहे. त्यांनी मराठ्यांसाठी आरक्षण मिळवून द्यावं, असंही जरांगे पाटील म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे की कोणता पक्ष आम्हाला साथ देत आहे. कोणता पक्ष किती ताकदीने उभं राहतो आणि कोण कोणावर अन्याय करतो तो आज आमच्या लक्षात येईल, असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि तेही महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र हवं आहे. हे भीजत घोगंड ठेवू नका, तुम्हाला जे काही करायचं ते करा, असं आवाहन त्यांनी सर्व पक्षांना केलं आहे.

- Advertisement -

मराठा समाजानं सर्व राजकीय पक्षांना भरभरून दिलं. आता ते किती साथ देतात आणि आरक्षणासाठी मनातून काम करतात, त्यांच्या मनात किती खोट आहे की प्रेम आहे ते आज उघडं होईल. तसंच, ओबीसी बांधवांवर अन्याय होऊ देऊ नका, पण आमच्यावर देखील अन्याय करू नका , असंही ते यावेळी म्हणाले. उपचार सोडण्यावर जरांगे पाटील म्हणाले की, माझा उपचारच मराठा आरक्षण आहे, आज मी सर्वपक्षीय बैठक लागली आहे त्यात माझ्या वेदनांवर सर्वांनी उपचार करावे. माझ्या समाजाच्या वेदना आहेत त्याच वेदना माझ्या आहेत, माझे उपचार म्हणजेच मराठा आरक्षण आहे.

(हेही वाचा: संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी, नाना पटोलेंची जळजळीत टीका )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -