Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पूजा चव्हाण आत्महत्येचे गूढ वाढले

पूजा चव्हाण आत्महत्येचे गूढ वाढले

यवतमाळमध्ये पूजा अरूण राठोडचा गर्भपात

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येत आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण नाव पूजा आणि त्यानंतर या प्रकरणात अरूण राठोडचे असलेले कनेक्शन यावरून पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे मंत्री आणि अरूण राठोड यांची ही व्हायरल ऑडिओ क्लिप आहे त्यातही गरोदरपणाबद्दल चर्चा होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पूजा अरूण राठोड ही 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक 3 होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचे रिपोर्टमध्ये दिसते आहे. याप्रकरणी डॉ. श्रीकांत वराडे हे डॉक्टरही नॉटरिचेबल झाले आहेत.

- Advertisement -

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचे नावही उघड झाले.

- Advertisement -