घरCORONA UPDATECorona: केंद्र, राज्य सरकारला 'नाम'च्या वतीने एक कोटी रुपयांची सहायता निधी

Corona: केंद्र, राज्य सरकारला ‘नाम’च्या वतीने एक कोटी रुपयांची सहायता निधी

Subscribe

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये पाठवणार असल्याचे ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगितले आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनने पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपये पाठवणार असल्याचे स्वतः ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगितले आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. जगासह देशावर तसेच राज्यावर कोरोनाचे संकट कोसळले असून सर्वच स्तरातून आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशात आता शेतकऱ्यांसाठी काय गंभीरपणे उभी राहणारी नाम संस्था या कठिण प्रसंगीदेखील मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

ऐका काय म्हणाले नाना पाटेकर 

‘नमस्कार मी नाना पाटेकर, या क्षणाला आपण सगळ्यांनी जात, धर्म, पंथ विसरुन सरकारला सहकार्य करणं गरजेचं आहे. इतक्या मोठ्या आपत्तीशी सरकार एकटं नाही लढू शकणार. आपण आपआपला वाटा उचलायला हवा. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पीएम आणि सीएम फंडासाठी प्रत्येकी ५० लाख पाठवणार आहोत. तुम्हीही तुमचा वाटा उचलाल याची खात्री आहे. कृपया घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणं ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे या क्षणाला. एवढी मेहरबानी करा. धन्यवाद!’

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: जीवावर खेळून बॉलिवूडची अभिनेत्री कोरोनाबाधितांसाठी बनली नर्स

- Advertisement -

नाना यांनी केले सरकारचे कौतुक

नाम फाउंडेशनतर्फे प्रत्येकी ५०-५० लाखांची मदत सीएम आणि पीएम फंडासाठी करण्यात आली असून त्यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद असल्याचे नाना पाटेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २२० झाली आहे. तर देशातील रुग्ण एक हजारांवर गेले आहेत. संपूर्ण देश लॉकडाउन आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वारंवार घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. संचारबंदी आणि लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, याचा पुनरुच्चार नाना यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -