घरमहाराष्ट्रNadda Meet Cm Shinde : जेपी नड्डांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; जागावाटपाबाबत...

Nadda Meet Cm Shinde : जेपी नड्डांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; जागावाटपाबाबत चर्चा?

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी यांनी मुंबई येऊन भाजपा पदाधिकाऱ्यांचा क्लास घेतला.

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असून, त्यांनी काल भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तासभर झालेल्या या भेटीदरम्यान लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. (Nadda Meets CM Shinde JP Nadda meets CM Shinde Discussion about space allocation)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच अनुषंगाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी यांनी मुंबई येऊन भाजपा पदाधिकाऱ्यांचा क्लास घेतला. असे असतानाच महायुतीतील घटकपक्ष असलेला शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपावर एकमत व्हावे या अनुषंगाने चर्चा केली जात आहे. त्याच अनुषंगाने नड़्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mahanand Dairy : ‘जय हो महानंद की…’; जितेंद्र आव्हाड संतापले

राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी

जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या झालेल्या भेटीत जागावाटपाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीमध्ये लोकसभेच्या 48 जागांचं वाटप कसं होणार हा प्रश्नही चर्चिला गेला. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. मात्र राष्ट्रवादीचा एकही नेता या बैठकीला हजर नव्हता. हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : Deepak Kesarkar : केसरकरांविरोधात सिंधुदुर्गात मालवणी भाषेतील बॅनर; सोशल मीडियावर चर्चा

असा आहे महायुतीचा जागावाटपाचा संभाव्य फॉर्मुला

महाविकास आघाडीसह महायुतीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अद्याप कुणाकडूनच जागावाटप फायनल न झाल्याचे दिसते. अशातच महायुतीचा जागाटपाचा संभाव्य फॉर्मुला समोर आला आहे. यामध्ये 32-12-4 चा फॉर्म्युला म्हणजे भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवणार, शिवसेना (शिंदे गट) 12 जागा लढवणार तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 4 जागा लढवणार. मात्र, या फॉर्म्युलाबाबत छगन भुजबळ यांना विशेष अधिवेशनाच्या दिवशी विचारलं गेलं असता शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील तितक्याच आम्हालाही दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी असेल असं म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -