Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाफेडने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक; मुख्यमंत्र्यांनी मानले...

नाफेडने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

Subscribe

नाफेडनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2410 प्रति क्विटंल दरानं कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच आक्रमक झाला होता. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकराच्या या निर्णयाचा विरोध करून आंदोलनं केली होती. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापलं होतं. अखेर, वाढता विरोध पाहता कांद्याच्या प्रश्नावर केंद्रानं दिलासादायक निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. (Nafeds decision to purchase 2 lakh metric tonnes of onion is historic The Chief Minister eknath Shinde thanked the Prime Minister Narendra Modi )

एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचेही आभार. नाफेडनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित 2 हजार 410 प्रति क्विटंल दरानं कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

- Advertisement -

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मी देखील अमित शहा आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारने दिली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आमची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी अडचणीत येतो, तेव्हा सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहतं. हे आतापर्यंत आपण पाहिलं आहे. जेव्हा अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपीट झाली, तेव्हा सरकार सर्व नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं राहिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. आता या मोठ्या संकटामध्येदेखील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

कांद्याची साठवणूक क्षमता वाढवणार

- Advertisement -

कांद्याची साठवणूक क्षमता कशी वाढवता येईल यादृष्टीने चर्चा झाली. काही निर्णय घेतले, त्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कांदा चाळी वाढवणं, त्यांचं अनुदान वाढवणं, तसंच मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती करणं आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून नाशवंत वस्तू जास्तीत जास्त टिकवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेतला जात आहेत. कांद्याची महाबॅंक ही संकल्पना राबवत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

कांदाप्रश्नी कृषीमंत्र्यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट

कांदा निर्यातीवर 40% निर्यातशुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कांदा खरेदीसाठी प्रती क्विंटल 2410 रुपये हा जाहीर केलेला दर समाधानकारक असून शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विक्री करावी, तसेच शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे, केंद्र सरकार आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही केंद्रीय मंत्री गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -