नागपंचमीवर कोरोनाचं सावट; सांगलीतील बत्तीस शिराळ्यात यंदा नागपंचमी उत्सव नाही

nag panchami not celebrated in battis shirala in sangli

श्रावणातला पहिला सण नागपंचमी. पण यंदाच्या नागपंचमीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शेकडो वर्षांची पंरपरा जपण्यासाठी फक्त मानाच्या पालखीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच आज शिराळा मधील अंबामात मंदिर बंद ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरामध्ये फक्त ५ लोकांना पूजेसाठी तर पालखी सोहळ्यासाठी १० लोकांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडीत झाली आहे. याबाबतची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजिती चौधरी यांनी दिली आहे.

यंदा शिराळ्यात साध्या पद्धतीने नागपंचमी उत्सव केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनचं बत्तीस शिराळ्यातील परिसरात जाऊन लोकांना नागपंचमीसाठी घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहेत.

…म्हणून नागपंचमी साजरी केली जाते

भगवान शंकराला श्रावण मासातील आराध्य दैवत मानले जाते. त्यामुळे या भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान असलेल्या नागालाही तितकेच विशेष महत्त्व दिले जाते. म्हणूनच नागपंचमीला नागाची पूजा विशेष मानली जाते. श्रावण महिना हा पावसाचा म्हणजेच वर्षा ऋतू असतो. ज्यामुळे भूगर्भातील नाग बाहेर भूतलावर येतात. त्यामुळे भूतलावरच्या लोकांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते.


हेही वाचा – विविध राज्यात अशी साजरी होते ‘नागपंचमी’