घरताज्या घडामोडीविवस्त्र करुन मारहाण करण्याच्या व्हिडिओमागे 'त्या' दाम्पत्याचा हात

विवस्त्र करुन मारहाण करण्याच्या व्हिडिओमागे ‘त्या’ दाम्पत्याचा हात

Subscribe

नगर दांम्पत्य मारहाण प्रकरणाला वेगळं वळण

सामूहिक अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, यासाठी धमकावत नगरमधील महिलेला विवस्त्र करुन केलेल्या मारहाण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असताना पोलिसांच्या तपासात पती-पत्नीनेच स्वत:ला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे दाम्पत्याचा बनाव उघडा पडला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतल्यानंतर पत्नीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झालेल्या क्लिपसंदर्भात तपास केल्यानंतर मित्रांच्या संगनमताने हा व्हिडीओ तयार झाल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मारहाण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत महिला आणि तिच्या पतीला पळवून नेत त्यांना विवस्त्र करुन मारहाण केली गेली. या प्रकरणाचा व्हिडीओ चित्रफित तयार करुन ती व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी पिडीत महिलेचा भाऊ, दिर, चुलत सासरे अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार थेट विधीमंडळाच्या अधिवेशनातही गेल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी नगरला भेट देत संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली.


हेही वाचा – आईला जीव लाव…, तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, नगर पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पिडीतेच्या मित्राला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर वेगळाच प्रकार समोर आला. पोलिसांनी याप्रकरणी आणखी काही जणांना ताब्यात घेतल्यावर तक्रार करणाऱ्या दाम्पत्यानेच हे कुभांड रचल्याचे समोर आले. पोलिसांनी पिडीतेच्या पत्नीला बुधवारी रात्री ताब्यात घेत चौकशी सुरु केल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. पिडीतेच्या पतीने पाथर्डी येथून आपल्या तीन मित्रांना बोलावत त्यांना एका हॉटेलमध्ये दारुची पार्टी दिली. पिडीता आणि तिच्या पतीला विवस्त्र करुन मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडीओ तयार करण्याचा मास्टर प्लॅन या पार्टीत शिजला. त्यानंतर स्टेशन रस्त्यावरील एका निर्मनुष्य ठिकाणी एका खोलीत हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचे पिडीतेच्या पतीने सांगितले. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला. दरम्यान पिडीतेच्या पतीला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दबाव आणण्यासाठी पिडीत पत्नीनेदेखील घरातील फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -