घरमहाराष्ट्रधक्कादायक! नगर अर्बन बँकेत लिलावासाठी ठेवलेलं कोट्यावधीचं सोनं निघालं बनावट

धक्कादायक! नगर अर्बन बँकेत लिलावासाठी ठेवलेलं कोट्यावधीचं सोनं निघालं बनावट

Subscribe

नगर अर्बन बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने बुधवारी सोन्याचा रितसर लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. लिलावाची प्रक्रिया सुरु करण्याआधी या सोन्याची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीत पहिल्याच पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बनावट बेन्टेक्सचे दागिने आढळून आले. त्यामुळे लिलावात सहभागी झालेले सराफ व्यावसायिक निघून गेले. मात्र यामुळे बँकेत कोट्यावधी रुपयांचे सोने तारण घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी आता पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बँकेच्या पुणे आणि नगरमधील काही शाखांमध्ये यापूर्वीच बोगस कर्जप्रकरणे समोर आली होती. त्याप्रकरणी गुन्हे दाखल करत चौकशी सुरु होती, त्यात आता आणखी कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे कर्जाच्या प्रकरणांत भर पडली आहे.

- Advertisement -

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बुधवारी हे सोने लिलावासाठी ३६४ पिशव्या आणण्यात आल्या होत्या. तारण ठेवलेल्या या सोन्यावर बँकेकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मात्र बनावट सोन्याच्या माध्यमातून हे कर्ज वितरित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नगर अर्बन बँकेत कोट्यावधी रुपयांचा सोन तारण घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान सोना तारण असलेल्या सर्व सोन्याचा पंचनामा करुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बँकेतील गैरव्यवहारांसंबंधी सातत्याने पाठपुरावा करणारे बँकेचे माजी संचालाक राजेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, भैवनाथ वाकळे, पोपट लोढा तेथे दाखल झाले. त्यांनी यासंबंधी प्रशासकाला जाब विचारला. मात्र, प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांनी समाधानकारक उत्तरे देता कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

जगातील ‘या’ सर्वात आनंदी देशात विदेशी प्रवाशांना मिळतेय नोकरीसह राहण्याची सुवर्ण संधी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -