घरताज्या घडामोडी११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार

११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार

Subscribe

राज्यातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील तर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी दिली.

एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८८, डिसेंबर २०२१ मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या १८ आणि ७ नवनिर्मित अशा एकूण ११३ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आणि १ नोव्हेंबर २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती, सूचना दाखल करता येतील. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

- Advertisement -

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती मदान यांनी दिली.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी:

ठाणे: मुरबाड, शहापूर
पालघर:  तलासरी, विक्रमगड, मोखाडा
रायगड:  खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
रत्नागिरी:  मंडणगड, दापोली
सिंधुदुर्ग : कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे
पुणे: देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित),
नाशिक : निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी
धुळे:  साक्री
नंदुरबार:  धडगाव,वडफळ्या, रोषणमाळ, अहमदनगर:  अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी
जळगाव:  बोदवड, औरंगाबाद, सोयगाव

- Advertisement -

हेही वाचा – पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करा, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -