घर महाराष्ट्र नागपूर Dengue : नागपुरात डेंग्यूचा झपाट्याने प्रसार, महापालिकेला उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश

Dengue : नागपुरात डेंग्यूचा झपाट्याने प्रसार, महापालिकेला उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे निर्देश

Subscribe

गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा झपाट्याने प्रसार होत आहे. अद्यापही नागपूर मनपा डेंग्यूवर आळा घालण्यास यशस्वी ठरली नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा झपाट्याने प्रसार होत आहे. अद्यापही नागपूर मनपा डेंग्यूवर आळा घालण्यास यशस्वी ठरली नसल्याचेच दिसून येत आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात झपाट्याने होणारा डेंग्यूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजन करावी आणि याबाबतचा अहवाल हा 6 सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. (Nagpur bench directed the Municipal Corporation to prevent the spread of dengue)

हेही वाचा – Mumbai Crime : विवाहीत असूनही घटस्फोटीत भासवले, दुसरे लग्न करून शरीर संबंध ठेवले; हायकोर्टाने…

- Advertisement -

नागपूर शहरांसह जिल्ह्याच्या अनेक भागांत डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणी एका वकिलाकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली. यामध्ये शहरात डेंग्यूचे 1 हजार 245 रुग्ण असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. परंतु, नागपूर महानगरपालिकेने गेल्या 15 दिवसांमध्ये डेंग्यूचे 92 रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यास मनपा अपयशी ठरल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आलेला आहे.

जुलै महिन्यात नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला. यामुळे नागपूर शहरातील उत्तर आणि पूर्व भागांमध्ये पाणी साचले होते. ज्यानंतर याच भागांमध्ये डेंग्यूचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली. नागरी वस्त्यांमधील वाढती रुग्ण संख्या आधीच नागपूर महानगरपालिका प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. पण तरी देखील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे डेंग्यूचा धोका आणखी वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु तरी देखील डेंग्यूचे रुग्ण कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सध्या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पुढील 6 दिवसांत नागपूर मनपा उपाययोजनांबाबतचा कोणता अहवाल सादर करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -