घरताज्या घडामोडीभरदिवसा वाघाचा हल्ला, तीन जण गंभीर जखमी

भरदिवसा वाघाचा हल्ला, तीन जण गंभीर जखमी

Subscribe

सिहोरा परिसरात सकाळच्या सुमारास महालगाव फाट्यावर वाघाने भरदिवसा धुमाकुळ घातला आहे. तुमसर तालुक्यातील बिनाखी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सिहोरा परिसरात सकाळच्या सुमारास महालगाव फाट्यावर वाघाने भरदिवसा धुमाकुळ घातला आहे. यात वाघाने तीन जणांवर जोरदार हल्ला केला आहे…हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही गावकऱ्यांनी योग्य वेळी दाखवलेल्या सतर्कतेमुळे थोडक्यात मृत्यूपासून बचावले आहेत. हे तीन जण मोटारसायकलवरून जात असताना वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यानंतर वाघापासून बचावासाठी त्या ठिकाणी उपस्थीत सर्व लोक ईकडे तिकडे पळू लागले. तुमसर तालुक्यातील बिनाखी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.

हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी

शंकर तुरकर (६७) मु. पंढरवानी (मध्यप्रदेश), छोटेलाल ठाकरे (३५) मु. गोंदेखरी आणि वीरेंद्र सहारे (४५) मु.सिंदपुरी या तिघांना वाघाने गंभीर जखमी केले आहे. गावकऱ्यांमुळे ते वाघाच्या जाळ्यातून सुटू शकले अन्यथा मोठी हानी झाली असती. जखमींना सिहोरा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी नेले होते. त्यानंतर पुढील उपचरासाठी भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

गावकरी चितेंत

त्याठिकाणी दिवसाढवळ्या वाघ कसा आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वारंवार होणाऱ्या या प्रसंगांमुळे गावकरी मोठ्या चितेंत सापडले आहेत. यापूर्वी गोंदेखरी येथीलच गणेश बनकर यांना त्याच वाघाने जखमी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -