घरट्रेंडिंगअमेरिका रिटर्न व्यक्ती करोना पॉझिटिव्ह, सनदी अधिकारी मात्र नाही

अमेरिका रिटर्न व्यक्ती करोना पॉझिटिव्ह, सनदी अधिकारी मात्र नाही

Subscribe

दोन दिवसापूर्वीच ते अमेरिका दौरा करून नागपुरात परतले होते

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या नागपूर एक व्यक्ती कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातला पहिलाच रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या व्यक्तीवर सध्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आता राज्यातील करोनो रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे. त्यांना उपचारासाठी आयसोलेट करण्यात आले असून ते सध्या उपचार घेत असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वीच ही व्यक्ती अमेरिका दौरा करून नागपुरात दाखल झाले होते. पण त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्यानेच त्यांनी स्वतःहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

करोना सदृश्य लक्षणे आढळल्यानेच त्यांची करोनासाठीची चाचणी करण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात त्यांची करोना चाचणी सकारात्मक आढळल्याचे समोर आले आहे. नागपुरात करोनाचा रुग्ण आढळल्याबाबत आरोग्य विभागाकडूनही याआधी स्पष्ट करण्यात आले होते. काही प्रसार माध्यमांनी याबाबत वृत्तही ऑनलाईन प्रसिद्ध केले होते. मात्र, माय महानगरने यासंदर्भात अधिक चौकशी केली असता. राज्यातील कोणत्याही सनदी अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने गुरुवारी दुपारी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -