घरताज्या घडामोडीधक्कादायक! वेळेवर उपचार न घेतल्याने ८० टक्के मृत्यू; पालिकेकडून मृत्यूंचे विश्लेषण

धक्कादायक! वेळेवर उपचार न घेतल्याने ८० टक्के मृत्यू; पालिकेकडून मृत्यूंचे विश्लेषण

Subscribe

नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक होत असून दिवसाला ४० ते ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर नागपूरमध्ये कोरोनाचा तांडव सुरु असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या दररोज ४० ते ५० जणांचे मृत्यू होत असल्याने प्रशासन सुद्धा चिंतेत आले आहे. त्यामुळे आता त्याची कारणे शोधायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे होणारे ८० टक्के मृत्यू हे वेळेवर उपचारासाठी न आल्याने होत असल्याचे नागपूर प्रशासनाने सांगितले आहे.

दिवसाला ५० जणांचा मृत्यू

नागपूर शहरात कोरोनाचा उद्रेक होत असून दिवसाला ४० ते ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या स्मशानभूमीत सुद्धा वेटिंग लिस्ट वाढल्याचे चित्र आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली असून पालिकेने आता डेली डेथ analysis करायला सुरुवात केली आहे. त्यातून समोर आले की, ‘नागरिक आपली लक्षणे लपवित आहेत. आधी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. मात्र, कोरोनाची चाचणी करत नाही. पण, जास्त त्रास होण्यास सुरुवात झाली का कोव्हिड रुग्णालयात येतात. मात्र, तोपर्यंत उशिर झालेला असतो आणि त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. तसेच आतापर्यंत ८० टक्के रुग्णांचा याच कारणामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.’

- Advertisement -

टेस्ट करुन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर

बऱ्याचदा नागरिकांच्या मनात भिती असते. मला त्रास होत आहे आणि मी जर टेस्ट करुन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय करावे? उपचार घ्यायचे म्हटलं, तर डॉक्टर मिळेल का?, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येतात. त्यामुळे अनेक जण टेस्ट करायचं टाळत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. मात्र, महापालिका नागरिकांना वारंवार आवाहन करत आहे की, कोरोनाची भीती बाळगू नका. मात्र, काळजी घ्या आणि लक्षणं दिसत असल्यास तात्काळ उपचार घ्या. परंतु नागरिक भीतीमुळे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.


हेही वाचा – Corona : २०२४ पर्यंत सर्वांना मिळू शकेल कोरोनाची लस; या कंपनीने केला दावा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -