राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अधिवेशन १७ एप्रिलला होणार, समाजाच्या मागण्या साडवण्याचा प्रयत्न

Nagpur District Convention of National OBC Federation will be held on 17th April
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अधिवेशन १७ एप्रिलला होणार, समाजाच्या मागण्या साडवण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने मागील ७ वर्षापासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांसाठी संघर्ष सुरु आहे. ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशभर अधिवेशन, धरणे आंदोलन इत्यादी संविधानिक मार्गाचा अवलंब करून ओबीसी समाजास आपल्या अधिकार कर्तव्याची जाणीव करुन देण्यात येत आहे. संविधानानुसार सोयी व सवलती ओबीसी समाजास मिळाल्या पाहिजे, परंतु त्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष होऊनही अजुनपर्यंत मिळत नाहीत त्या मिळायला पाहिजे या करिता ओबीसी समाजास संघटीत करून केंद्र व राज्य सरकारकडे सातत्त्याने ओबीसी समाजाच्या मागण्या मांडून सोडविण्याच्या प्रयत्न करीत असते.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. १७ एप्रिल २०२२ रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता गादा ( कामठी ) जिल्हा नागपूर येथे नागपूर शहर आणि ग्रामीण चे संयुक्त अधिवेशन आयोजित केले आहे.

या अधिवेशनाला आमदारांची उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यास प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सहकार्य केले अशा मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक, शहरातील इमारत व्यवसायिक सरपंच संघ या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

ग्रामीण भागामध्ये ओबीसीच्या मागण्या आणि जागरण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व लहान थोर मंडळी कामाला लागले आहेत. अधिवेशनात संयुक्तरीत्या दोन्ही पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. यात प्रामुख्याने ग्रामीणचे नागपूर तालुक्यातील १३ तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी नागपूर शहर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष तथा महिला अध्यक्ष यांच्या परिश्रमाने मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकत्र होऊन अधिवेशना मार्फत मागण्याचा एल्गार शासनापुढे करणार आहे, कोणत्याही परिस्थितीत ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन या सरकारने लवकरात लवकर करावे तसेच राज्याने ओबीसीच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी काढाव्यात, या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा : दादर स्थानकात 2 एक्स्प्रेस आमने-सामने; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत