Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भयंकर! नागपूरात एकाच बेडवर पॉझिटिव्हसह संशयित रुग्णावर उपचार

भयंकर! नागपूरात एकाच बेडवर पॉझिटिव्हसह संशयित रुग्णावर उपचार

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत झपाट्याने वाढत आहे. यात मुंबई. पुणे, नागपूर कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरत आहेत. या जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. यामुळे रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान नागपूरमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसोबतच बेड्सची कमतरता जाणवत आहे. यामुळे नागपूरच्या एका रुग्णालयात दोन कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर कोरोना संशयित रुग्णाला एकाच बेडवर उपचार दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळतोय. दरम्यान २४ तासांत नागपूरमध्ये तीन हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागपूरात ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना घरीच उपचार सुरु आहेत. तर ज्यांची प्रकृती अधिक अस्थिर आहे, अशा रुग्णांना रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर आरोग्य यंत्रणेवर ताण सोसावा लागत आहे. नागपूरातील शासकीय महाविद्यालयात बेडच्या कमतरतेमुळे कोरोना पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांना एकाच बेडवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. नागपूरमधील सर्वाधिक सरकारी रुग्णालयांमध्ये अशीच स्थिती पाहयला मिळतेय. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या नागपूरकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.


हेही वाचा- १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांची मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक

- Advertisement -

 

- Advertisement -