नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे कोरोना पॉझिटिव्ह

Tukaram-Mundhe-
तुकाराम मुंढे

आपल्या बेधडक भूमिका आणि निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या नागपूरच्या महानगरपालिका आयुक्तपदी कार्यरत असणारे तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः यासंबंधीची माहिती देणारे ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी घरातूनच काम करणार आहे, तसेच गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी सुद्धा कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

कोरोना फायटर आयुक्त तुकाराम मुंढे 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेकदा कठोर निर्णय घेतले आहेत. कोरोना लॉकडाउन काळात बाजारपेठेत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर मुंढे यांनी रस्त्यावर उतरून कारवाई करणाऱ्या आयुक्तांनी वेळप्रसंगी पीपीई किट परिधान करून कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्णांची भेटदेखील घेतली आहे. शहरातील एकाही व्यक्तीचा जीव कोरोनामुळे जाऊ नये हा माझा प्रयत्न आहे. याचसोबत मिशन बिगीन अगेन अंतर्गत मिळालेल्या सवलतींकडे संधी म्हणून पाहणो गरजेचे आहे. कोणतेही नियम मोडले जाणार नाही याची काळजी घेणो हे प्रत्येक नागरिकाचो कर्तव्य असल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले होते. नागपूर कोरोनामुक्त करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मास्टर प्लॅन बनवला होता. नागपूरमधील सतरंजीपुरा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी सतरंजीपुरामधील जवळपास १७०० लोकांना क्वारंटाईन केले होते. तसेच या परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे २०० जवान तैनात केले. तसेच गरोदर मातांची तपासणी, टीबी पेशंट शोधून त्यांची वेगळी तपासणी असे अनेक उपक्रम मुंढे यांनी राबवले.

हेही वाचा –

ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला आजपासून सुरुवात