नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बीडमधील सरपंच हत्या प्रकरण ताजं असतानाच आता नागपूरमध्ये दिवसाढवळ्या खून झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरमधील भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान या ख्रिश्चन दफनभूमीत एका युवकाने दफनभूमीच्या सुरक्षारक्षकावर चाकूने हल्ला केला. रमेश शेंडे असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात रमेश याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nagpur murder in broad daylight at a christian cemetery)
नेमकं प्रकरण काय?
नागपूरमधील जरीपटका परिसरात असलेल्या भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान आहे. या ख्रिचन दफनभूमीत रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक यूवक हातात चाकू घेऊन शिरला. चाकू घेऊन आलेल्या युवकाला सुरक्षारक्षक रमेश शेंडे याने पाहिले आणि त्याच्या दिशेने धाव घेतली. तसेच, युवकाला पुढे जाण्यापासून अडवत रमेश याने चाकू का आणला, अशी विचारणा केली. यावेळी त्या युवकाने रमेश याच्यावर चाकूने वार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काही नागरिकांना रमेशच्या दिशेने धाव घेत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय प्रोटेस्टंट ख्रिचन कब्रस्थान येथे अंत्यविधीसाठी आलेल्या जेकब किरण यांनी धावत जाऊन त्या युवकाला पकडले. मात्र चाकू वार झाल्याने रमेश शेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. काही नागरिकांनी रमेश यांना रुग्णालयात पोहचवले तर आरोपीला किरण यांनी घट्ट पकडून ठेवले. आरोपी पळून जाण्यासाठी झटापट करीत असतानाच किरण यांनी जरीपटका पोलिसांना फोन केला आणि संपूर्ण हत्याकांडाची माहिती दिली. त्यावेळी जारीपटका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली आणि त्याच्या गुन्हा दाखल केला.
दरम्यान, राज्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या, परळीत गोळीबार, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असतानाच नागपूर शहरातून घडलेल्या दोन हत्याकांडांनी संपूर्ण शहर हादरले आहे.
हेही वाचा – Sanjeev Jaiswal : म्हाडा उपाध्यक्ष जैस्वाल यांच्यावर गुन्हा, निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने केले गंभीर आरोप