शिंदे फडणवीसांविरोधात ‘ते’ ट्वीट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं एका तरूणाला चांगलंच भोवलंय.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणं एका तरूणाला चांगलंच भोवलंय. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा युजर मुंबईतला असून तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता आहे. असं सांगण्यात येत आहे.

नागपुर येथील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्थक कपाडी असं या तरूणाचं नाव आहे. या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह् ट्वीट केलं होतं. “एकनाथ शिंदे तुला हे सर्व इथेच भोगाव लागणार आहे तुला एका बापाने जर काढला असेल ना तर निवडणुका घेऊन दाखव आणि हो तुमच्यासारख्या फालतू लोकांचे बाप कुठे एक असतो हजारो असतात. एकनाथ शिवरायांच्या आशीर्वादामुळे नाही तुझा बाप बसलाय ना दिल्लीत त्याच्या आशीर्वादाने तुला धनुष्यबाण भेटला आहे”, असं त्याने या ट्वीटमध्ये लिहिलं होतं.

तसंच “चंद्रकांत पाटील चंपा तुझी लायकी नाहीये लोकसभा निवडणूक लढण्याची आता तू निवडून आलास ना पुण्यातली त्या महिलेच्या जागेवर निवडून आला आहेस चुत्या चंपा तुझ्या लायकीत रहा.” असं ट्वीट करून चंद्रकांत पाटील यांच्यावरही आक्षेपार्ह् ट्वीट केलं होतं.

याविरोधात आमदार कृष्णा खोपडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हा युजर ठाकरे गटाचा असल्याचं देखील या तक्रारीत म्हटलंय. हा तरूण उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता असून उद्धव ठाकरेंसोबत तो उठतो बसतो. असा दावाही खोपडे यांनी केला आहे.

सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह् ट्वीट केलं होतं… याप्रकरणी मुंबईत राहणाऱ्या सार्थक कपाडी या तरुणाविरोधात नागपुरात लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.