घरताज्या घडामोडीजेल म्हणजे कैद्यांची क्रिएटिव्हिटी! कारागृहातील वस्तूंचा भरला दिवाळी मेळावा

जेल म्हणजे कैद्यांची क्रिएटिव्हिटी! कारागृहातील वस्तूंचा भरला दिवाळी मेळावा

Subscribe

महाराष्ट्र जेल प्रॉडक्ट्स एंटरप्राइज सेल सेंटरच्या माध्यमातून जेलमधील कैद्यांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या काही खास वस्तूंचा दिवाळी मेळावा भरवण्यात आला आहे.

जेल म्हटल की आपल्याला आठवतात ते तिथले कैदी. खुन, ड्रग्ज अशा विविध गुन्हांची शिक्षा म्हणून भोगण्यासाठी आलेले कैदी. जेल म्हणजे आपल्यासाठी केवळ कैद्यांची जागा, त्यांची भांडणे आणि मारामारी हेच डोळ्यांसमोर येत असेल मात्र कैद्यांच्या याच प्रतिमेला छेद देणारा एक नवा उपक्रम महाराष्ट्र कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे (Maharashtra Jail Deputy Inspector General Swati Sathe) यांनी सुरू केला आहे.  महाराष्ट्र जेल प्रॉडक्ट्स एंटरप्राइज सेल सेंटरच्या माध्यमातून जेलमधील कैद्यांनी दिवाळी निमित्त तयार केलेल्या काही खास वस्तूंचा दिवाळी मेळावा भरवण्यात आला आहे. या दिवाळी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभाला कोणत्याही मोठ्या सेलिब्रेंटींना ना बोलावता कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते हा उद्घाटन सोहला पार पडला.

- Advertisement -

जेल हे ठिकाण केवळ कैद्यांच्या शिक्षा भोगण्यासाठी ठिकाण नसून जेल म्हणजे कैद्यांची सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसानासाठी असलेले ठिकाण असल्याचे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी म्हटले आहे. जेल म्हणजे मोबाईल, गांजा, कैद्यांची भांडणे आणि मारामारी या प्रतिमेला छेद देणारा आमचा दिवाळी मेळावा आज सुरू झाला, असे म्हणत कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

दिवाळी निमित्त जेलमधील कैद्यांनी तयार केलेल्या अनेक वस्तू नागपूर येथील शोरुममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या वस्तूंमध्ये लाकडापासून तयार केलेले डोअर किचेन,लाकडाच्या खुर्च्या, कागदाचे कंदील त्याचप्रमाणे सतरंजी यांच्या समावेश आहे. जेल म्हणजे केवळ गांजा,कैद्यांची भांडणे किंवा मारामारी नसून जेल म्हणजे एक क्रिएटिव्ही आहे. जेल म्हणजे उत्पादन आणि सुधारणा तसेच पुनर्वसनाचे ठिकाण असल्याचे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan Khan Drugs Case: दुसऱ्या दिवशी अनन्या पांडेची NCB कडून चार तास चौकशी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -