घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरनागपूर-पुणे प्रवास आता फक्त 7 तासांत; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

नागपूर-पुणे प्रवास आता फक्त 7 तासांत; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Subscribe

मुंबई ते नागपूरनंतर आता नागपूर ते पुणे प्रवास वेगवान होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला नवा मार्गा जोडण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळे केवळ सात तासांत नागपूर ते पुणे प्रवास करता येणार आहे.

मुंबई ते नागपूरनंतर आता नागपूर ते पुणे प्रवास वेगवान होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला नवा मार्गा जोडण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळे केवळ सात तासांत नागपूर ते पुणे प्रवास करता येणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. (Nagpur to Pune Nagpur to Pune via hindu hridaysamrat Samruddhi Mahamarg Central Minister Nitin Gadkari)

नागपूर येथून पुण्याला येण्यासाठी तब्बल 14 ते 16 तासांचा अवधी लागतात. 14 ते 16 तास नागपूर-पुणे प्रवासासाठी लागत असल्याने वाहनचालकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन कारावा लागतो. परिणामी हा प्रवास वेळ कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

नागपूर-पुणे हा प्रवास जलद करून केवळ 7 तासांवर आणला जाणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडून नवा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुककर होणार आहे. या प्रकल्पाची माहिती गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे.

“नागपूर ते पुणे हा वेळ खाऊ प्रवास आहे. पुण्याला येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता तसेच दळणवळणाच्या दृष्टीकोणातून हा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. या साठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला एक नाव मार्ग जोडून हा नाव मार्ग तयार केला जाणार आहे”, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

- Advertisement -

कसा आहे नवा मार्ग?

  • हा नाव मार्ग पुणे ते औरंगाबाद दरम्यान अससणार आहे.
  • औरंगाबाद जवळ एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो समृद्धी मार्गाला जोडण्यात येणार आहे.
  • समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबादचा प्रवास साडेपाच तास औरंगाबाद ते पुणे प्रवास अडीच तास असा हा प्रवास
  • केवळ ७ ते ८ तासांचा होणार आहे.

हेही वाचा – इराकच्या फुटबॉल स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -