नागपूर हादरले! दारूची नशा भिनली, वृध्द सासू सासऱ्यची कुऱ्हाडीने खांडोळी केली

या हत्याकांडामुळे नागपुरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Murder of a job seeker in uran

कौटुंबिक वादातून नागपूरमध्ये हत्येची थरारक घटना घडली आहे. आरोपीने आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. यावेळी आरोपीने पत्नी आणि मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. या हत्याकांडामुळे नागपुरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Nagpur trembled! Intoxicated, the old mother-in-law and father-in-law stabbed)

नरमू यादव या आरोपीने मद्यप्रशन केले होते. दारूच्या नशेत त्याने हा जीवघेणा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. नरमू यादव याला पत्नी कल्पना यादव आणि मुलगी मस्कान यादव यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, आरोपीने सासू-सासऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात ते जागीच मृत झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कुटुंबात कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे आरोपी नरमू यादव याने मद्य प्राशन केले. या दरूच्या नशेतच त्यांना सगळ्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो जवळच्या जंगलात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.