घरताज्या घडामोडीवर्ध्यातील उत्तम गाल्वा कंपनीत भीषण स्फोट, २५ जण जखमी

वर्ध्यातील उत्तम गाल्वा कंपनीत भीषण स्फोट, २५ जण जखमी

Subscribe

वर्धा शहराजवळ असलेल्या भूगावातील उत्तम गाल्वा स्टील कंपनीत आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटात २५ जण जखमी झाले आहेत.

वर्धा शहराजवळ असलेल्या भूगावातील उत्तम गाल्वा स्टील कंपनीत आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटात २५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सावंगी येथील दत्ता मेघे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फर्निशचा स्फोट झाल्याने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाचे वृत्त कळताच पोलीस व अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घातली. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून अनेकांना बाहेर काढण्यात आले आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे कामगार काम करत असताना हा स्फोट झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा कंपनीत एकूण ५० कामगार होते असे सांगण्यात येत आहे. स्फोटामुळे लागलेली आग काही क्षणातच वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे जीव वाचवण्यासाठी कामगार वाट दिसेल तिथे सैरावेरा धावू लागले. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे अनेकजणांना कंपनीतून बाहेर पडता आले नाही व ते आतच अडकले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -