घरमहाराष्ट्रनागपूर...यासाठी माजी कृषीमंत्री शरद पवारांची भेट घेणार - अब्दुल सत्तार

…यासाठी माजी कृषीमंत्री शरद पवारांची भेट घेणार – अब्दुल सत्तार

Subscribe

मुंबई – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 10.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी कृषी विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पांझलीबोधी व वारंगा येथील अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी केली.यावेळी नागपूरसह विदर्भात झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात माहिती देताना शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. जुलै महिन्यापर्यंतचे पंचनामे झाले असून पुढील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले. पुढे त्यांनी शेतीविषयक प्रश्नांसाठी शरद पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीमंत्री सत्तार काय म्हणाले –

- Advertisement -

नागपूर विभागात झालेल्या अतिवृष्टीचा नुकसान आढावा घेतला असून जुलै पर्यंतचे पंचनामे 100 टक्के झाले आहेत. त्यानंतर झालेल्या पावसाचे नुकसानीचे पंचनामे अर्धे झाले आहेत. यावेळी, अनेक नागरिक जन प्रतिनिधींची मी भेट घेतली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत आहे. पुढील 3, 4 दिवसात सगळे पंचनामे होतील. सोमवारी मी सभागृहात यासंदर्भात निवेदन करणार असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे शक्य आहे, ते आम्ही करणार आहोत. राज्यातील मंत्री, कलेक्टर आणि महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवसभर त्यांच्या जीवन शैलीचा अभ्यास करणार आहेत. प्रशासनाला शेतकऱ्यांची व्यथा समजण्यासाठी हा प्रयोगशील उपक्रम राबविण्यात येईल, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले.

केंद्रीय पथकाने दिली भेट –

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागाला मोठा फटका बसला आहे. नुकतेच केंद्रीय पथक विभागाच्या दौऱ्यावर येऊन गेले. येथील पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राचे पथक पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी येणार आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीपेक्षा कितीतरी कमी नुकसान दाखवण्यात आल्याची ओरड केली जात आहे. त्यामुळे कृषिमंत्री सत्तार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वच शेतकऱ्यांचे डोळे लागले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -