घरमहाराष्ट्रनागपूरअजित पवारांकडे अध्यक्षपद नको, कारण...; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे मोठे वक्तव्य

अजित पवारांकडे अध्यक्षपद नको, कारण…; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे मोठे वक्तव्य

Subscribe

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) अध्यक्षपद सोडल्यानंतर नवा अध्यक्ष कोण? अशी चर्चा पूर्ण देशात सुरू आहे. पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी आपली पसंती अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे  (Supriya Sule) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांना दर्शविल्यामुळे अजूनच चर्चा होत आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत त्यांना नापंसती दर्शविली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार यांनी सर्वांना धक्का देत राजकीय निवृत्तीची घोषणा केली. शरद पवार यांच्या निर्णयावर बोलताना शालिनीताई म्हणाल्या की, ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी आजही कामकाज पाहत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला असल्याचे शालिनीताई पाटील म्हणाल्या.

- Advertisement -

अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होईल
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू झालेली असतानाच अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचे समोर आले, मात्र शालिनीताई पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पसंती दर्शवत अजित पवारांवर मोठे आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, अजित पवार घोटाळेबाज असून काही गुन्ह्यामध्ये अडकले असल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल, असे मत शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केले.

…म्हणून ईडीकडून कारवाई नाही
भाजपाचे मोठे नेते अजित पवारांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अद्याप ईडीकडून चौकशी झालेली नाही. हसन मुश्रीफ यांची चौकशी होते, मग चौदाशे कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -