Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागपूर देवेंद्र फडणवीसांची रातोरात दिल्ली वारी; दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?

देवेंद्र फडणवीसांची रातोरात दिल्ली वारी; दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच?

Subscribe

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडमोडी घडताना दिसत आहेत आणि पुढील दिवसात अजून काहीतरी होणार असे दिसत आहे. कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी शुक्रवारी (19 मे) रात्री उशीरा तातडीने दिल्ली दौरा (Immediately Delhi Tour) करून नागपूरला परतले असल्याची बातमी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एवढ्या तातडीने दिल्लीला का गेले असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांसाठी दिल्ली गेले आणि ते मध्यरात्री नागपूर परतले. या कालावधीत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. कारण आज सकाळी दहा वाजता आमदार राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनाही मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण शिंदे-फडणवीस सरकारला पुढील काही दिवसात वर्ष होईल. हे सरकार आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार व्हायला दीड महिन्याच्या आसपास कालावधी लागला होता. त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी शक्याता आहे.

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकराबद्दल बोलायचे झाले तर सध्या सध्या मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत. त्यातील 9 शिंदे गटाचे आणि  9 भाजपाचे मंत्री आहेत. परंतुत शिंदे गटातील अनेक माजी मंत्र्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यांना संधी मिळते की इतर मंत्र्यांना संधी मिळते हे पाहावे लागेल.

या मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता
शिंदे गटातील संजय शिरसाट, भारत गोगावाले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहस कांदे, बच्चू कडू, तर भाजपामधील संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीन पोटेकर, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना दुसऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण दोन दिवसांपूर्वीच दोन दिवसांपूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू झाल्याचेही म्हटले जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -