घरमहाराष्ट्रनागपूरप्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे; राऊतांच्या थुंकण्याप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे; राऊतांच्या थुंकण्याप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले. त्यांचा थुंकण्याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  शिंदे गटाकडून राऊतांवर टीकास्त्र सोडले जात आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे. (Everyone should act in moderation, Ajit Pawar’s reaction to Sanjay Raut’s spitting incident)

अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय शिबिरासाठी नागपूर दाखल झाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी, कार्यकर्त्यांनी आपली काही महाराष्ट्र संस्कृती आहे, परंपरा आहे, आपला काही इतिहास आहे, तो जपली पाहिजे. आपल्या सर्वांना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंकृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसा काम करू शकतो ते देशाला दाखवून दिलेले आहे. त्यामुळे आपण मला प्रश्न विचारता आहात, परंतु मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, राऊत म्हणाले की, मला काहीतरी त्रास होत होता म्हणून मी तसे केले, माझा त्यामागचा हेतू तो नव्हता. परंतु प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे एवढीच माझी भूमिका आहे.

- Advertisement -

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर होणार चर्चा
अजित पवार यांनी सांगितले की, नागपूरात आजपासून राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर होत आहे. त्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील. कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरही या चिंतन शिबिरात चर्चा होणार आहे. ओबीसी आरक्षणासाठी आम्ही कोर्टात गेलो होतो. वंचित समाजालाही योग्य आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी पक्ष जे काही करावे लागेल त्यासाठी तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी अजित पवार यांना जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. त्यांनी असेही सांगितले की, जेव्हा यााबबत चर्चा होईल त्यावेळी आपणच त्याची माहिती देऊ.

खडसे मुंडे यांच्यामध्ये घरोब्याचे संबंध
अजित पवार यांना एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीबाबात प्रश्न विचार असता ते म्हणाले की, त्या दोघांनी अनेक वर्ष एका राजकीय पक्षामध्ये एकत्र काम केले आहे. असे अनेक जण एकमेकांना भेटत असतात. स्व. गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. एकनाथ खडसे मुंडेंना नेता मानत होते. गोपीनाथ मुंडे यांनी एकनाथ खडसे यांना खूप संधी दिली, विरोधी पक्षनेता वगैरे केले. त्यामुळे त्या दोघांचे घरोब्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांची भेट घेण्यात काही गैर आहे असे मानण्याचे कारण नाही. त्यावरुन उगीच कुणी राजकारण करु नये. ते योग्य नसल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली.

- Advertisement -

मविआ जागा अदलाबदलीची चर्चा नाही – निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. त्यामुळे महा विकास आघाडीच्या जागांच्या अदलाबदलीवर काही बातम्या येत आहेत. त्याबाबत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -