IndiGo Flight : मुंबईहून रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo Flight) विमानातील प्रवाशाला फ्लाइटच्या मध्यभागी रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे विमानाचे नागपूरच्या (Nagpur) बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Babasaheb Ambedkar International Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यात आले. डी. तिवारी या 62 वर्षीय पुरुष प्रवाशावर नागपूर विमानतळावर तैनात किम्स किंग्सवे रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशावर उपचार केले, परंतु त्यांना वाचवता आले नाही. (IndiGo Flight Passenger vomits blood on Mumbai Ranchi flight Emergency landing in Nagpur and)
हेही वाचा – Onion Price : केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; ‘या’ ठिकाणी उभारणार विशेष खरेदी केंद्र
किम्स किंग्सवे रुग्णालयाचे डीजीएम एजाज शमी म्हणाले की, प्रवाशाला किडनी व टीबीचा त्रास होता. रात्री 8 च्या सुमारास प्रवाशाला फ्लाइटमध्ये रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर विमान नागपूरला उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याआधीच प्रवाशाचा मृत्यू झाला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया आणि मंजुरीनंतर इंडिगो विमानाने नागपूर ते रांचीचा प्रवास यशस्वीपणे पुन्हा सुरू केला, अशी माहिती एका निवेदनात म्हटले आहे.
IndiGo issues a press statement, “IndiGo flight 6E 5093, operating from Mumbai to Ranchi was diverted to Nagpur due to a medical emergency on board. The passenger was offloaded and was rushed to the hospital for further medical assistance. Unfortunately, the passenger did not… https://t.co/9mMJhaxmMH pic.twitter.com/67dOkglFQJ
— ANI (@ANI) August 22, 2023
इंडिगोने प्रवाशासंदर्भात एक निवेदन जारी
इंडिगो एअरलाइनने या घटनेबाबत निवेदन करताना म्हटले की, मुंबईहून रांचीला जाणारे इंडिगो विमान 6E 5093 हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे नागपूरला वळवण्यात आले. प्रवाशाला उतरवून पुढील वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने प्रवासी वाचले नाहीत. आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत.
हेही वाचा – Pending Case : महाराष्ट्रात तब्बल 5 लाखांहून अधिक खटले प्रलंबित; मुंबई, ठाण्यात किती?
नागपूर विमानतळावरची दुसरी घटना
नागपूर विमानतळावर मृत्यू होण्याची आठवड्याभरातली दुसरी घटना आहे. 17 ऑगस्ट रोजी इंडिगोच्या एका 40 वर्षीय पायलटचा मृत्यू झाला होता. पायलट मनोज सुब्रमण्यम यांची नागपूर विमानतळाव अचानक तब्येत बिघडली. ते दुपारी नागपूरहून पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्याच्या तयारीत होते, मात्र विमान बोर्ड होण्यापूर्वीच बोर्डिंग गेटजवळ बेशुद्ध पडले. यानंतर विमानतळाच्या ग्राउंड स्टाफच्या मदतीने पायलट मनोज यांना रुग्णालयात घेऊन गेल, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.