सरकारने वरवरच्या घोषणा करू नयेत, कृती करत पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी – अजित पवार

ajit pawar

राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. किती नुकसान झाले? आज पहाणीनंतर अजित पवार यांनी मी राजकारणासाठी दौरा करत नाही. मला राजकारण करायचे नाही. सरकारने वरवरच्या घोषणा करू नये. कृती करत पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार काय म्हणाले –

दौरा सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. यावेळी त्याच्याकडे तीन मागण्या केल्या होत्या आमचे खासदार आणि आमदार प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडत आहेत. पूरस्थितीची माहिती देत आहेत. पंचनामे अद्याप सुरू झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. मला प्रशानाचा अनुभव आहे. त्यामुळे सत्तेत असताना काय करायचे आणि विरोधात असताना काय करायचे हे मला माहीत आहे. मला यात राजकारण करायचे नाही. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झालेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

जणावरांची भरपाई द्या – 

पुरामुळे  मृत्यू  झालेल्या कुटुंबीयांना सरकारने पैसे दिले. पण पाळीव जणावरांची भरपाई दिलेली नाही. त्यामुळे वेळेत पैसे द्यायला हवेत, असे अजित पवार म्हणाले. मी नागपूरमधील लोकांना भेटलो. आता पुढच्या कार्यक्रमाला चाललो आहे. राजकारण करण्यासाठी दौरा करत नाही. दुसऱ्याने निवेदन देऊन त्यावर बोलणे आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्यातील बारकावे समजतात. त्यावर सभागृहात चांगले मांडलं जाते, असे त्यांनी सांगितले.