घरमहाराष्ट्रनागपूरLok Sabha : उमेदवारी रद्द होणार माहीत असतानाही काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना तिकीट;...

Lok Sabha : उमेदवारी रद्द होणार माहीत असतानाही काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना तिकीट; उदय सामंत यांचा आरोप

Subscribe

नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलं आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे विरोधक भाजपावर निशाणा साधत आहेत. मात्र शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यामागे काँग्रेसचं कटकारस्थान असल्याचा आरोप केला आहे. उदय सामंत रामटेक मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरोप केला आहे. (Lok Sabha election 2024 Ramtek Constituency Ticket to Rashmi Barve from Congress despite knowing that the candidature will be cancelled Uday Samants allegation)

हेही वाचा – Lok Sabha : भाजपाने वापरून अडगळीत टाकलेली लोकं आपल्याला येऊन भेटतायत – उद्धव ठाकरे

- Advertisement -

विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की, याठिकाणी महायुतीच्या 10 खासदारकीच्या जागा निवडून येतील असं चित्र आहे. विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्याला माहित आहे. राजकीय उष्णताही वाढलेली आहे. महायुतीसमोरचे जे सर्व उमेदवार आहेत, ते सर्व निष्रभ झालेले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोंदींचा 400 पारचा संकल्प पूर्ण होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

रामटेक मतदारसंघाचा आढावा घेत असताना आमच्या लक्षात आलं की, जे प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे, महायुतीच्या समोरच्या उमेदवाराचं ते पूर्णपणे काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे. एक महिला भगिनी उभी करायची, तिचं जात वैधता प्रमाणपत्र आहे की नाही हे राष्ट्रीय पक्षाने बघायचं नाही. उमेदवार उभं करून प्रमाणपत्र रद्द होणार आहे, हे माहीत असताना देखील त्यांना निवडणुकीत उतरवायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खापर विरोधकांवर फोडायचं या प्रकारचं षडयंत्र करून काँग्रेसने त्या उमेदवाराचा फॉर्म बाद केला, असा आरोप उदय सामंत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी रद्द होणार माहीत असतानाही काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना तिकीट; उदय सामंत यांचा आरोप

उदय सामंत म्हणाले की, आपल्या सर्वांना माहीत असेल की, रश्मी बर्वे यांनी फॉर्म भरल्यानंतर तातडीने एबी फॉर्म हा नागपूरमध्ये आला. काँग्रसेच्या कोणत्या आमदाराकडे आणि नेत्याकडे आला होता, ते तुम्हाला माहीत आहे. जर आपला उमेदवार बाद होणार हे तुम्हाला माहीत होतं, तर नाहक उमेदवाराची बदनामी करण्यासाठी निवडून येणं किंवा न येणं हा नंतरचा प्रश्न आहे. परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं ही रणनिती करून काँग्रेसने जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे, हे माहित असतानाही उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्यायी एबी फॉर्म त्यांनी नागपूरमध्ये तयार ठेवला होता. मी शिवसेनेचा किंवा महायुतीचा नेता म्हणून हे सांगत नाही आहे. काल लोकांकडून जे मी ऐकलं आहे. विशेषत: महिलांकडून जे ऐकलं आहे की, हा कुटील डाव होता आणि तो काँग्रेसचा होता. त्यामुळे या सर्व गोष्टी घडल्यानंतर वातावरण असं आहे की, महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -