घरमहाराष्ट्रनागपूरLoksabha Election 2024 : किरण सामंत यांच्या माघारीनंतर बंधू उदय म्हणतात..., आमचा...

Loksabha Election 2024 : किरण सामंत यांच्या माघारीनंतर बंधू उदय म्हणतात…, आमचा दावा कायम

Subscribe

नागपूर : महाराष्ट्रातील इतर काही जागांप्रमाणेच कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह शिवसेनेने लढविलेल्या सर्व जागा मिळाल्या पाहिजेत, अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली होती. त्यातच उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र मंगळवारी रात्री उशिरा किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माघार घेतली. अशातच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. (Loksabha Election 2024 After Kiran Samants withdrawal Brother Uday Samant says On Ratnagiri-Sindhudurg Constituency Our claim remains)

हेही वाचा – Ratnagiri-Sindhudurg Constituency : किरण सामंत यांची माघार; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

- Advertisement -

किरण सामंत यांच्या माघारीवर बोलताना उदय सामंत म्हणाले की, काल ज्या काही पत्रकार परिषद झाल्या. त्यानंतर अशी एक भावना निर्माण झाली की, तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी काल रात्री 9 वाजता भूमिका घेतली होती. त्यानंतर मी नागपूरमधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. उद्या 11 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक माझ्या निवासस्थानी आयोजित केली आहे. जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, ते संवेधनशील आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की, आमची जागा आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.50 लाख मतानी निवडून येऊ. पण तिकीट मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना घासाघीस करावी लागत आहे. या भावनेतून किरण यांनी भावनिक होऊन निर्णय घेतला होता. मात्र पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर आणि मी स्वत: त्यांच्याशी बोललो आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आजही शिवसेना-भाजपाचा आहे. शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत ते दुर्दैवाने आमच्यासोबत आलेले नाहीत. त्यामुळे त्या जागेवर आजही शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनाच त्याठिकाणी लढली पाहिजे, अशी सर्वांची भावना आहे. त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. जेव्हा एखादी व्यक्ती संवेदनशील आणि भावनाप्रधान असते, तिच व्यक्ती त्या मतदारसंघाचा विकास करू शकते. जो व्यक्ती कठोर असतो, तो मतदारसंघाचा विकास करू शकत नाही. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांची आम्ही समजूत घातली आहे. त्यामुळे कुठेही चिंता करण्याचे कारण नाही. आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे. आजही दावा आमचा आहे, अशा पुनरुच्चार करतानाच यासंदर्भात सर्व निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update: पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागांत बरसणार मेघधारा

शिवसेनेचा दावा कायम राहिल (Shiv Sena’s claim will continue)

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने दावा का केला आहे, यालाही लॉजिक आहे. प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे. भाजपाने दावा केला किंवा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी नाराज नाही. परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यातून किरण सामंत यांच्यापर्यंत मॅसेज गेला की या जागेमुळे मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होत आहे आणि त्या भावनेतून त्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता. कुटुंब म्हणून जर सांगायचं झाल तर त्यांच्यापेक्षा मी वयाने लहान असलो तरी राजकीय निर्णय हे आम्ही एकत्र बसून घेतो. त्यामुळे आमचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय झालेला आहे की, शिवसेनेचा दावा त्याठिकाणी कायम राहिल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -