Sana Khan : नागपूरमधील भाजपच्या (Bjp) सक्रिय पदाधिकारी सना खान (Sana Khan) संशयास्पदरित्या बेपत्ता आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी आज मुख्य आरोपीला अटक केली आहे. सना खान मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या हत्येप्रकणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Sana Khan Main accused arrested in case of murder of BJP functionary In front of shocking information)
सना खान यांच्या आईने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर मनकापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पथक जबलपूरला रवाना झाले होते. अमित शाहू ढाब्याला कुलुप लावून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करताना अमित साहूचा नोकर जीतेंद्र गौडा याला अटक केली होती. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली.
हेही वाचा – चाळण झालेल्या नाशिक-मुंबई महामार्गाची डागडुजी अंतिम टप्प्यात; किती दिवस टिकणार?
आरोपी अमित साहू जबलपूरमध्येच लपून बसल्याची पोलिसांना टीप मिळाली. इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सची मदत घेऊन पोलिसांनी अमित साहूला सापळा रचून जबलपूरमध्येच अटक केली. साहूने चौकशीदरम्यान सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अमित साहू मागील 10 दिवसांपासून जबलपूरमध्ये लपून बसला होता. मानकापूर पोलिसांचे पथक साहूला घेऊन नागपूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे पोलीस चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
सना खान 9 दिवसांपासून बेपत्ता
दरम्यान, भाजपा पदाधिकारी सना खान 1 ऑगस्ट रोजी जबलपूरमधील त्याचा बिझनेस पार्टनर आणि मित्र अमित उर्फ पप्पू साहू याला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तिथे पोहचल्यावर त्यांनी त्यांच्या आईला जबलपूरला पोहचल्याची माहिती दिली. सना खान आणि अमित साहू यांच्यामध्ये चांगले संबंध असल्यामुळे त्याच्या घरी थांबल्या होत्या. मात्र दुसऱ्या सना खान यांच्या आईने त्यांना फोन लावल्यावर फोन बंद लागला आणि त्या दिवसांपासून सना खान बेपत्ता झाली होती. त्यामुळे त्यांच्या आईने मनकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा – Pune Chandni Chowk : पुणे भाजपामध्ये नाराजीनाट्य; मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या
भाजपाने केली होती सीआयडी चौकशीची मागणी
सना खान बेपत्ता होऊन 9 दिवस उलटून गेले तरी आतापर्यंत मध्य प्रदेश पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस तिला शोधू शकले नव्हते, त्यामुळे नागपूर भाजपाकडून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले होते. अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस जुनैद खान यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हे प्रकरण आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावे, असे त्यांनी पत्रात म्हटले होते.