Eco friendly bappa Competition
घर नवी मुंबई नैना प्रकल्पातून सरकारकडून भांडवलदारांना प्रोत्साहन; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

नैना प्रकल्पातून सरकारकडून भांडवलदारांना प्रोत्साहन; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Subscribe

पनवेल येथे नैना प्रकल्प राबवून सरकार एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करून भांडवलदारांना प्रोत्साहन देतेय असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे.

पनवेल येथे नैना प्रकल्प राबवून सरकार एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करून भांडवलदारांना प्रोत्साहन देतेय असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर प्रकल्प बाधितांना जागेचा योग्य मोबदला मिळावा या स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी नैना प्रकल्प बाधितांचा लढा तीव्र करणार असल्याची ग्वाही आज (ता. 29 मे) अंबादास दानवे यांनी स्थानिक भूमिपुत्रांना दिली.

हेही वाचा – Sharad Pawar : राष्ट्रवादी सदैव कोळी बांधवांच्या पाठिशी; मच्छिमार महिलांचा NCP मध्ये प्रवेश

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पनवेल येथील विहिघर नेरे पाली येथे नैना प्रकल्पग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच नैना प्रकल्प उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांच्याकडून प्रकल्प बाधित जागेची माहिती जाणून घेतली. नैना प्रकल्प व अलिबाग विरार कॉरिडोअर प्रकल्पाबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत चर्चा देखील केली.

या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना 60 टक्के मोबदला देण्यात येत नाहीये. सरकार सिडकोच्या माध्यमातून स्थानिक भूमीपुत्रांची लूट करतेय.
शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना कमी मूल्य असलेल्या जमिनी द्यायच्या. उलट बिल्डरांना जास्त मूल्याची जागा सिडको देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे याबाबत एकत्रित धोरण अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

तर, शेतकऱ्यांवर बळजबरी करून व पोलीस बळाचा वापर करून सरकार हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करतेय. मात्र याविरोधात आवाज उठवून हा लढा आणखी तीव्र करणार असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी दिली.

तसेच, विरार अलिबाग कॉरिडोअरच्या बाधित मालमत्ता आधीच राजकीय नेत्यांनी, बिल्डरांनी मालमत्ता कमी भावात खरेदी केल्या. या प्रकल्पात कमी बाधित मालमत्ता व्हावी. जमीनाचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका दानवे यांनी व्यक्त करत या दोन्ही प्रकल्पाबाबत विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार व स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी स्थानिकांना दिले.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोज भोईर, बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख रायगड, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, तालुकाप्रमुख योगेश तांडेल, विश्वास पेटकर, उपतालुका प्रमुख बबन फडके, नैना प्रकल्प कमिटी सरचिटणीस शेखर शेळके, नरेंद्र भोपी नैना प्रकल्प कमिटी प्रवक्ता, मोहन भोपी, सुदाम पाटील काँग्रेस नेते आदी उपस्थित होते.

- Advertisment -