शरद पवार यांच्या भाषणांवर पुस्तक येणार, वाढदिवसानिमित्त ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे होणार प्रकाशन

Nakalchi bolne book publish on base of sharad pawar popular speech in his political journey
शरद पवार यांच्या भाषणांवर पुस्तक येणार, वाढदिवसानिमित्त 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचे होणार प्रकाशन

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांचे योगदान आहे. त्यांनी ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी, केंद्रीय मंत्रिमंडळातील जबाबदारी पार पाडली आहे. राजकीय प्रवासात पवारांनी अनेक सभा आणि मेळावे आपल्या भाषणांनी गाजवले आहेत. याच भाषाणांवर आता पुस्तक येणार आहे. त्यामुळे वाचकांना शरद पवार यांची भाषणे पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवडक भाषणांचे नेमकचि बोलणे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा प्रकाशन सोहळा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर २०२१ रोजी वाढदिवस आहे. शरद पवारांचा हा ८१ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कणखर आणि निवडक भाषणांवर पुस्तक येणार आहे. वाचकांना आता शरद पवारांचे भाषण पुस्तकात वाचायला मिळणार आहे. निवडक भाषणांचे नेमकचि बोलणे या पुस्तकाचे प्रकाशन उद्या शनिवार दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू सेंटर येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहेत.

शरद पवार यांच्या भाषणावरील पुस्तकाचे प्रकाशन डॉ.विजय केळकर, लेखक रंगनाथ पठारे आणि खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे लेखन-संपादन डॉ.सुधीर भोंगळे यांनी केले आहे तर सोहळ्याचे निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आहेत.


हेही वाचा : गृहराज्यमंत्र्यांच्या घराबाहेर बिबट्याचे दर्शन, म्हणाले घावला असता तर शिवबंधन….