घरमहाराष्ट्रदिवे घाटात वारकरी दिंडीत घुसला जेसीबी; नामदेव महाराजांचे वंशजांचे निधन

दिवे घाटात वारकरी दिंडीत घुसला जेसीबी; नामदेव महाराजांचे वंशजांचे निधन

Subscribe

दिवे घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात नामदेव महाराजांच्या वंशजाचे निधन झाले आहे.

पुण्याच्या दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे अपघाती निधन झाले आहे. दरम्यान, जखमींवर हडपसर नोबेल रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असा घडला अपघात

संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले होते. दरम्यान, काही अंतरावर जेसीबी उभा होता. जेसीबीचे ब्रेक निकामी झाले होते. तसेच चालकाला वाहन उतरवू नये अशी विनंतीही करण्यात आली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी राहुल भीमराव बंडगर यांनी दिली आहे. मात्र, तरी देखील चालकांनी जेसीबी चालवला आणि हा अपघात घडला. या अपघातात संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचे निधन झाले आहे.


हेही वाचा – पालिकेची मदत घेण्यास प्रिन्सच्या वडिलांचा नकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -