पुणे : सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला असतानाच शरद पवार ‘ओबीसी’ असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केला होता. नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फाललं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे. (Namdev Jadhav face turned black After criticism of Sharad Pawar NCP activists are aggressive Pune)
हेही वाचा – अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात; भुजबळांविरोधात करणार होत्या मोठा खुलासा
नामदेव जाधव हे सातत्याने शरद पवाराबद्ल वादग्रस्त वक्तव्य करत होते. नामदेव जाधव यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इंस्टीट्यूटमध्ये होणाऱ्या त्यांच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. तसेच नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला. यापार्श्वभूमीवर भंडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला. परंतु त्यानंतरही नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी भंडारकर इंस्टीट्युडटच्या प्रवेशद्वारावर पोहचले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे.
BREAKING : व्याख्याते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं
पुण्यात नामदेव जाधव माध्यमांसोबत संवाद साधत असताना त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं
पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला #LiveNews #NamdeoJadhav #MarathaReservation— My Mahanagar (@mymahanagar) November 18, 2023
नामदेव जाधव यांचा भंडारकर इंस्टीट्यूटमध्ये पर्यटनातून उद्योजकतेकडे हा कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी, यासाठी व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन भंडारकर इंस्टीट्यूटमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नामदेव जाधव प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करणार होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यानुसार ते भंडारकर इंस्टीट्युडच्या प्रवेशद्वारावरती पोहोचले. जेव्हा नामदेव जाधव इंस्टीट्यूटजवळ आले आणि ते माध्यमांशी संवाद साधत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं आहे.
हेही वाचा – AadityaThackeray : डिलाईल रोड पूल दहा दिवसांपूर्वीच पूर्ण झालाय, मोठा खुलासा
नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच ते शरद पवारांवर गंभीर आरोप करत होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले. त्यानंतर नामदेव जाधव घडलेल्या सर्व प्रकाराल राष्ट्रवादी काँग्रसचे नेते रोहित पवार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा करायला लावला, असेही त्यांनी म्हटले आहे.