घरमहाराष्ट्रवांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'वीर सावरकरांचं' नाव द्या; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘वीर सावरकरांचं’ नाव द्या; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

वांद्रे-वर्सोवा सी-लिंक या प्रस्तावित प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशी मागणी करणारं पत्र लिहिल्याचं समोर येत आहे.

वांद्रे-वर्सोवा सी-लिंक या प्रस्तावित प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशी मागणी करणारं पत्र लिहिल्याचं समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 13 मार्चला मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठवल्याची माहिती समोर येत आहे.  तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्याची मागणीही केली जात आहे.( Name Bandra Versova C Link Veer Savarkar Devendra Fadnavis letter to Chief Minister Eknath Shinde )

( हेही वाचा: कोस्टल रोडला संभाजी महाराजांचे नाव जाहीर केल्यानंतर काही तासांतच उपमुख्यमंत्र्यांचे ‘असे’ ट्विट )

- Advertisement -

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव

संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे. तसचं यावेळी त्यांनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसंच, त्यांनी मविआवर निशाणाही साधला, मागच्या सरकारने अल्प मतात आल्यावर घाईघाईने हा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

“छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

“हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाणार आहे. मराठा समाजाच्या बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -