… तर काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस पेटून उठेल, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

माध्यमांसोबत साधलेल्या संवादात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

Nana Patole

ज्या दिवशी भाजप गांधी परिवाराला (Gandhi Family) हात लावण्याचा प्रयत्न करेल त्यादिवशी महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातला काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस पेटून उठेल, असा घणाघात काँग्रेस नेते नाना पटोले (Congress leader Nana Patole) यांनी केला आहे. ते अमरावतीत झालेल्या धनगर समाज कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. माध्यमांसोबत साधलेल्या संवादात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

“भाजप सरकारकडून केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो. २०१४ पासून सरकारची ही भूमिका पाहिली आहे. पण तरीही ते गांधी परिवाराला साधा हातही लावू शकत नाहीत. या परिवाराच्या त्यागाची भूमिका या देशातल्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. म्हणूनच ज्या दिवशी हे लोक गांधी परिवाराला हात लावायला जातील तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रासह देशातला काँग्रेस कार्यकर्ता आणि सामान्य माणूस (Common Man) पेटून उठेल. त्यामुळे त्यांच्या वाट्याला जाऊ नका असा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे, असं नाना पटोले म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “भाजपला सत्तेच्या बाहेर जायची जेव्हा वेळ येते, तेव्हा गांधी, नेहरु परिवाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

देशात धर्मांधता वाढत चालली आहे, असं सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उदयपूरमध्ये (Udaipur) झालेल्या चिंतन शिबिरात म्हटलं होतं. त्यांच्या या वाक्याला सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही समर्थन केलं आहे. त्यामुळे आम्ही मोहन भागवत यांच्या भूमिकेचं स्वागत करतो, असंही नाना पटोले म्हणाले.