Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र वाघनखांवरुन नाना पाटेकरांचा मुनगंटीवारांना खोचक टोला, म्हणाले...

वाघनखांवरुन नाना पाटेकरांचा मुनगंटीवारांना खोचक टोला, म्हणाले…

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात येणार असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेकडून मंत्री मुनगंटीवार यांचे कौतुक करण्यात येत आहे. परंतु नानांनी त्यांच्या इन्स्टाग्रामला याबाबतची पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खानाचा वध केला होता, ती वाघनखं म्हणजे भारतीयांसाठी नेहमीच अभिमानाची वाटत राहिली आहेत. तिच वाघनखं आता भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सेनापती अफझल खान याचा वध करण्यासाठी वाघनखांचा वापर केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची तिच वाघनखं आता भारताला परत करण्याचं ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून या महिन्याच्या अखेरीला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करार करण्यासाठी लंडनचा दौरा करणार आहेत. याबाबत योग्य तो करार झाला तर या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराज यांची ती ऐतिहासिक वाघनखं मायभूमीत परत येणार आहेत. ही सर्व महाराष्ट्रीयांसाठी आनंदाची बाब असली तरी या मुद्द्यावरून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. (Nana Patekar hit Sudhir Mungantiwar on Waghnakh)

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजस्थानात काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

वाघनखे भारतात येणार असल्याने महाराष्ट्रातल्या जनतेकडून मंत्री मुनगंटीवार यांचे कौतुक करण्यात येत आहे. परंतु नानांनी त्यांच्या इन्स्टाग्रामला याबाबतची पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. नाना पाटेकर यांनी लिहिले आहे की, “मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणत आहेत..त्याबद्दल अभिनंदन…जमलं तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Nana Patekar (@iamnanapatekar)

 शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला होता ती ऐतिहासिक वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. आता ही वाघनखं भारतात येण्याची तयारी सुरू झाली आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, आम्हाला ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळाले आहे. यात त्यांनी वाघनखं परत देण्याचे मान्य केले आहे. ऑक्टोबर रोजी आम्ही लंडनला जाणार असून ऑक्टोबरला करार होईल. नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं हिंदुस्थानमध्ये येतील.

- Advertisement -

तसेच, आम्ही सुरुवातीला ही वाघनखं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नेण्याचे ठरवले होते. मात्र, या करारानुसार, आम्हाला तसे करता येणार नाही. ही वाघनखं एकाच जागी ठेवावी लागणार आहेत. महाराष्ट्र, देशभरातून येणारे मावळे ते पाहू शकतील, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच वाघनखं ही फक्त एक वस्तू नसून ती आमच्या आस्थेचा विषय आहेत, असेही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -