Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन पाटलांनी माफी मागावी, नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन पाटलांनी माफी मागावी, नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा

काँग्रेस पक्ष सर्व जिल्हा तालुका स्तरावर कोरोना मदत सहाय्य केंद्र सुरु करत असून व जनजागरण मोहीम हाती घेतली आहे.

Related Story

- Advertisement -

मागील वर्षभरापासून देशात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्याने सतत केंद्राकडे लसींच्या पुरवठ्याबाबत मागणी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. वाढत्या कोरोना परिस्थितीच्या आधारावर आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती आहे. त्या परिस्थितीच्या आघारावर काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने १४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर पूर्ण राज्यभर करण्याच्या वतीने करण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णालयात बेडस मिळणे, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांना अडचणी येतात या अडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष सर्व जिल्हा तालुका स्तरावर कोरोना मदत सहाय्य केंद्र सुरु करत असून व जनजागरण मोहीम हाती घेतली आहे.

- Advertisement -

यानिमित्ताने जसे बूथ असते त्याचं फक्त मतदानासाठी वापर होताना लोकांनी पाहिले आहे, परंतु कोरोनामुक्त बुथ असे एक नवीन अभियान काँग्रेसच्या वतीने सुरु करण्यात येत आहे. तसेच कोरोना वॉर्ड रुम सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात सुरु करणार असून त्याचे मुख्य कार्यालय मुंबईत राहील तसेच प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यालयात हे वॉर्ड रुम असतील. त्याला त्या त्या जिल्ह्यातील लोकांना जे काही मदत पाहिजे असेल ती पुरवली जाईल.

काँग्रेसचे सर्व जिल्हा कार्यालये २४*7 हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. तसे मुंबईत टिळक भवनात सांगितल्याप्रमाणे हेल्पलाईन सुरु करत आहेत. या कामामध्ये काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष त्यांच्याकडे विभागवारी जबाबदारी देत आहे. कार्याध्यक्ष, पालकमंत्री, संपर्कमंत्री प्रत्येक भागात जाऊन मदत मिळत आहे का नाही याचा आढाव घेतील तसेच ज्यांना मदत मिळत नाही त्यांना मदत मिळवून देतील. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या मोहीमेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री अमित देशमुख यांच्या विशेष उपलब्ध अस्थापनाचीही मदत घेतली जाणार आहे. काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आटोक्यात आणण्यासाठी ध्या घेतला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -