Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रPolitics : नाना पटोलेंचे निवडणूक आयोगावर आरोप; धनंजय मुंडे म्हणतात, विरोधकांचा भाबडेपणा...

Politics : नाना पटोलेंचे निवडणूक आयोगावर आरोप; धनंजय मुंडे म्हणतात, विरोधकांचा भाबडेपणा…

Subscribe

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत मतदानाची आकडेवारी दाखवत साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधक ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यांनी मतदानाची आकडेवारी दाखवत साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते शिर्डी येथे माध्यमांशी बोलत होते. (Nana Patole allegations against the Election Commission and strong response from Dhananjay Munde)

नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपासंदर्भात धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ते लोकं जेव्हा लोकसभेत जिंकतात तेव्हा त्यांना जनतेने जिंकवलं आणि जेव्हा विधानसभेत पराभव होते, तेव्हा ईव्हीएममुळे हरलो, अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकला आहे. त्यामुळे आता ईव्हीएमबाबत मतदान कसं झालं? किंवा उशिरा का झालं? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. त्यांनी पराभव मोठ्या मनाने मान्य करावा, जसं आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला होतो. आमचा पराभव झाला तेव्हा आम्ही ईव्हीएमवगैरेवर बोललो नाही. पराभवानंतर जनसेवा केली. त्यामुळे विधानसभेला जनतेने अभूतपूर्व यश महायुतीला दिलं. त्यामुळे जनतेने आम्हाला दिलेला यश महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने मान्य करावं, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Assembly Election : मतांच्या तफावतीप्रकरणी काँग्रेस पक्ष…; नाना पटोलेंकडून इशारा

जनतेने तुम्हाला जो धडा शिकवलाय त्यावर बोला

दरम्यान, 2029 मध्ये शिंदे पवार राजकारणातून हद्दपार होतील, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसचे नेते जे म्हणत आहेत किंवा आरोप करत आहेत, त्यांनी सध्या त्यांची काय अवस्था झाली, हे एकदा बघावं. ते कुठून कुठपर्यंत आले आहेत, हे बघावं. त्यांनी जी काही लाज होती, ती तेवढी पण ठेवली नाही. त्यामुळे माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की, जेवढी लाज राहिली आहे तेवढी तरी त्यांनी राखावी. ते 2029 च सांगत आहेत, पण महाराष्ट्रातील मायबाप जनतेने आज त्यांना जो धडा शिकवला, त्याबाबतीत बोला? असे आव्हान धनंजय मुंडे यांनी विजय वडेट्टीवारांना केले. याप्रकरणी वडेट्टीवार किंवा काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात…; काय म्हणाले अंबादास दानवे?


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -