गरीब-श्रीमंतातली दरी कुणामुळे वाढतेय हे सर्वांना माहीत आहे, नाना पटोलेंचा हल्लाबोल

nana patole

देशातील मूठभर लोकं श्रीमंत होत आहेत. तर एक मोठा वर्ग गरिबीच्या खाईत लोटला जातोय. यासाठी काही लोकं जबाबदार आहेत. तसेच बेरोजगारीसाठी जबाबदार असणाऱ्यांना गणराय चांगली बुद्धी देवो, हीच आजच्या दिवशी प्रार्थना आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले म्हणाले की, जगात श्रीमंत भारतातला एक माणूस होतोय. गरीब-श्रीमंतातली दरी कुणामुळे होतेय, हे सर्वांना माहिती आहे. आज गणेशोत्सवामुळे मी बोलत नाही. उगाच त्याला राजकीय वळण मिळेल. पण मला जे बोलायचं ते लोकांना समजलं. मूठभर लोकचं आज श्रीमंत व्हायला निघाली आहेत. देशातले मोठ्या प्रमाणावर लोक गरीब व्हायला निघालेत. सध्याची कृत्रिम महागाई ज्यांनी वाढवली आहे, त्यांना गणराय सद्बुद्धी देवो, असे नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष होता आणि राहणार हे निश्चित आहे. मधल्या काळात डोकी फिरवून काँग्रेस कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला. पण आगामी निवडणुकांत आमचा पक्षच मोठा हे सिद्ध होईल, असं नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : राज्यात शिक्षकांची 31 हजार 472 पदे रिक्त, मनपा शाळांची स्थिती काय?