घरमहाराष्ट्रNana Patole : दक्षिणेत भाजपाला बंदी, तेलंगणातील काँग्रेसच्या विजयानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole : दक्षिणेत भाजपाला बंदी, तेलंगणातील काँग्रेसच्या विजयानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Subscribe

पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येणार होती. परंतु, आता पाचपैकी केवळ एका राज्यात काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार आहे. याबाबत आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली मत व्यक्त केले आहे.

मुंबई : मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणापैकी मिझोराम वगळता चार राज्यांची मतमोजणी आज (ता. 03 डिसेंबर) करण्यात येत आहे. सध्या ते चार राज्यांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी तेलंगणा राज्यात काँग्रेसला जवळपास बहुमत मिळाल्याचे निश्चित झाले आहे. तर अन्य तीन राज्यांत भाजपाची सत्ता स्थापन होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पाचपैकी तीन राज्यात काँग्रेसची सत्ता येणार होती. परंतु, आता पाचपैकी केवळ एका राज्यात काँग्रेसला सत्ता स्थापन करता येणार आहे. याबाबत आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली मत व्यक्त केले आहे. दक्षिणेतील तेलंगणावर काँग्रेसवर विजय मिळवित म्हटले की, दक्षिणेत भाजपाला बंदी घालण्यात आली आहे. (Nana Patole: BJP banned in South, Nana Patole’s reaction after Congress victory in Telangana)

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपच्या राज्यात तेवढेच स्वस्त आहे…, खासदार संजय राऊतांची बोचरी टीका

- Advertisement -

चार राज्यांचे निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचा आदर करतो. दक्षिणेत भाजपाला दारं बंद करण्यात आली आहेत. पण उत्तर भारतात विशेष करून राजकारणाचे ध्रुवीकरण करण्यास काँग्रेसला यश आले आहे. हे कोणाला नाकारता येणार नाही. हिंदू-मुस्लिम या सर्व विषयावर भाजपा राजकारण करते हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. पण जनतेच्या विकासाच्या प्रश्नाच्याबाबत भाजपा नेहमी दूर पळते. आज जरी आम्ही हरलेलो असलो तरी उद्या जनता काँग्रेसला देशाच्या सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीचे वातावरण देश पातळीवर तयार झाले आहे. काही लोक सांगत आहेत की नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांना विश्वास आहे पण लोकसभेच्या निवडणुकीत लोकांकडून भाजपाचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असे या निकालातून पाहायला मिळत आहे.

तसेच, मागच्या वेळी आम्ही या तिन्ही राज्यांत विजय मिळवला होता. पण विजयाच्या साधारणतः 6 महिन्यांनंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात आमचा पराभव झाला. आता हेच उलटे होणार आहे. विधानसभेत जरी आता भाजपाला कौल मिळालेला असला तरी लोकसभेत काँग्रेसला कौल मिळणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून ज्या काही चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून काँग्रेस भविष्यात नक्कीच विजय मिळवेल. काँग्रेस कधीच बार्गेनिंगमध्ये राहिलेला पक्ष नाही. या पक्षाने कायमच सर्व व्यवस्थेला सोबत घेऊन काँग्रेस पक्ष चाललेला आबे. ज्यामुळे देशाचे स्वातंत्र्य हेच काँग्रेसला महत्त्वाचे आहे. खुर्चीपेक्षा काँग्रेस आहे त्याच विचारांसोबत या देशात लढा देत आहे आणि त्यामुळे जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी पाहणार असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

तसेच, काँग्रेसला कोणताही आत्मविश्वास नडलेला नाही. त्यांनी राज्यातील, देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी बोलयला हवे. त्यांनी राहुल गांधींपर्यंत जायचे गरज नाही. आहे त्या विषयांवर बोलायची सध्या गरज आहे. तर जर कोणी या विजयावरून, पराभवावरून कोणताही काही बोलत असेल तर ते त्यांचे मत आहे. अजून बराच निकाल बाजू आहे. राहिला पनौती शब्दावरून सुरू असलेला वाद. तर या शब्दावरून जर का भाजपा प्रचार करत असेल तर ते त्यांना लखलाभ असो. या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर परिणाम होणार नाही. ज्या राज्यात पराभव झाला यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. ज्या महाराष्ट्रात मोदींनी 2014 मध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भरोसा आहे की नाही हे लोकसभेतून कळून येईल. त्यामुळे देशातील सरकार हे भविष्यात बदलेलच असा दावा यावेळी नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला आहे.

तेलंगणात झालेला विजय हा केवळ राहुल गांधींचा नाही. याबाबत ते अनेकदा बोललेले आहेत. हा विजय जनतेचा आहे. हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. विजयाचे श्रेय ते कधीच घेत नाही. आमच्याकडे किंवा राहुल गांधी यांच्याकडे मी पणा नाही. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दक्षिणेत आम्ही भाजपाला बंदी घातली आहे. दक्षिणेत सगळे थांबले असले तरी ज्या तीन राज्यात भाजपाचा विजय झाला आहे तिथला ट्रेंड आम्ही सांगितला आहे. ज्यामुळे आता जसे आमच्यासोबत मागील वेळेस झाले होते. त्याप्रमाणे आता त्यांच्यासोबत होणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -