घरताज्या घडामोडीभंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडल्याचा नाना पटोलेंचा दावा, पोलिसांनी दावा फेटाळला

भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडल्याचा नाना पटोलेंचा दावा, पोलिसांनी दावा फेटाळला

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मी मोदींना मारू शकतो. या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपकडून नाना पटोलेंवर टीकास्त्र सोडण्यात येत असून त्यांना अटकेची मागणी केली आहे. परंतु नागपूर विमानतळावर नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींनी पकडलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदींना पकडलं आहे. इतर लोकांची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जात आहे. ज्या लोकांनी तक्रार दाखल केली. त्यांचेही स्टेटमेंट घेण्यात आले आहेत. परंतु मुळ मुद्दा असा आहे की, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न जे केंद्र सरकारने निर्माण करून ठेवले आहेत. गरीब आणि छोटे व्यापारी असे अनेक प्रश्न असून दुर्लक्षित करण्याचं काम भाजपाकडून केलं जातंय. तसेच अर्थाचा अनर्थ करून महाराष्ट्राचं नाव खराब करण्यासाठी निघाले आहेत. मात्र, आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते अशा प्रकारचं कृत्य करत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

कुठलंही कारण नसताना मला अटक करण्यासाठी मागणी

मी सातत्याने सांगत आहे की, पंतप्रधानांचं पद हे देशाचं पद असून ते कोणत्याही पक्षाचं नाहीये. हे काँग्रेसला चांगलंच माहितीये. कारण काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय. काँग्रेसनेच या देशाला मोठं केलंय. त्यामुळे पंतप्रधानांचं पद त्याची महिमा आणि गौरव काँग्रेसला चांगलंच माहितीये. परंतु ज्या पद्धतीने भाजपा कोरोना विषाणूचे नियम मोडून आंदोलन करत आहे. तसेच कुठलंही कारण नसताना मला अटक करण्यासाठी मागणी केली जातेय. त्यामुळे भंडारा पोलिसांना हे प्रकरण सांगितलं असून त्यांना चौकशी करण्यासाठी सांगितलं आहे.

महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू

जर लोकांनीही त्या पद्धतीची तक्रार केली नसेल आणि गावगुंडं जर त्या परिसरात नसतील तर निश्चितपणाने माझ्यावर कारवाई करा. पण जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर मी भाषण देत नव्हतो. लोकांचं गऱ्हाणं ऐकूण मी त्यांना सांगत होतो. परंतु याचा मोठा बवाल करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राची जनता भाजपला जागा दाखवेल.

- Advertisement -

गावगुंडांना मारण्याची भाषा का?

मी लोकांच्या समोर भाषणाच्या माध्यमातून बोलत नव्हतो. जर मी भाषणातून बोललो असतो तर ठीक आहे. परंतु लोकांना हिंमत देण्याचं कर्तव्य आमचं आहे. नीरव मोदी आणि ललीत मोदी जे देशाला लुटून देशातून फरार झाले. जे लोकं दाऊतला फासावर चढवण्याची भाषा करत होते. ते लोकं का बोलत नाहीत. जेव्हा डॉ. मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी आताचे पंतप्रधान आणि भाजपाचा स्वभाव त्यांच्यासोबत कसा होता याची विसर त्यांना पडली आहे. परंतु काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान पदाची गरिमा कुठेही कमी पडून देणार नाही. याची काळजी घेतली जातेय आणि पंतप्रधानांचा आम्ही नेहमी सन्मान करू, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंचा दावा भंडारा पोलिसांनी खोडून काढला

मोदी नावाच्या गावगुंडाला पोलिसांनी पकडलं असं नाना पटोले म्हणाले होते. परंतु भंडारा पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही, अशी माहिती भंडारा पोलिसांनी दिली आहे. ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत आणि ज्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. तसेच चौकशीला आता सुरूवात झालेली आहे, अशी माहिती भंडारा पोलिसांनी दिलीये.


हेही वाचा : Nana Patole on PM: नाना पटोले वादात अमृता फडणवीसांची उडी, ट्विट करत साधला निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -