Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रNana Patole : तो आवाज माझा नाही; बिटकॉइनच्या आरोपांवर काय म्हणाले पटोले?

Nana Patole : तो आवाज माझा नाही; बिटकॉइनच्या आरोपांवर काय म्हणाले पटोले?

Subscribe

खोटे आरोप करून बदनाम करण्याचे भाजपचे कट कारस्थान जनता उधळून लावेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

मुंबई : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे भाजपने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. मंगळवारी (19 नोव्हेंबर) पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा तसेच अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यावर आता नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हे सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. (Nana Patole congress on bitcoin allegation in Maharashtra Election 2024)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : जनता पॉझिटिव्ह कामच निवडणार, मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास 

- Advertisement -

बिटकॉईन प्रकरणात भाजपाकडून करण्यात येत असलेल्या खोट्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, “मतदानाच्या दिवशी माध्यमांना हाताशी धरून बिटकॅाईन प्रकरणी माझ्यावर खोटे आरोप करून काँग्रेस पक्षाची आणि माझी बदनामी करण्याचा खोडसाळपणा भाजपाने केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांनी या प्रकरणाची व्यवस्थित माहिती घेऊन वार्तांकन केले पाहिजे. दुर्देवाने भाजपच्या इशार्‍यावर खोडसाळपणे आमची बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे तो माध्यमांनी तात्काळ थांबवावा नाहीतर खोट्या बातम्या देणार्‍या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

तसेच नाना पटोले पुढे म्हणाले की, “लोकसभेत व्होट जिहाद झाल्याचा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. एखाद्या जात समुहाने एका पक्षाला मतदान करा असे आवाहन केले तर त्याला भाजपा व्होट जिहाद म्हणतो. मतदान कोणाला करायचे हा मतदाराचा हक्क आहे. आता एका समाजाने भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, त्यालाही ‘जिहाद’ म्हणायचे का?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, भाजपा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे आरोप केले. यावेळी त्यांनी यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले. भाजपाच्या या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -