Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election 2024 : विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष ठरणार; पटोलेंनी व्यक्त...

Maharashtra Election 2024 : विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष ठरणार; पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

Subscribe

महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी (20 नोव्हेंबर) पार पडत आहे. अशामध्ये राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. अशामध्ये बुधवारी झालेल्या मतदानामध्ये पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपली जबाबदारी पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील मतदान करत महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. “विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. (Nana Patole congress vote in Maharashtra Election 2024 criticized BJP)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मतदानाच्या दिवशीच केदार दिघेंवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? 

- Advertisement -

“राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे,” असा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, “भाजपने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते?” असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

“कार्यकर्त्यांना भेटायला गेलो हा विनोद तावडेंचा बचाव चुकीचा आहे. प्रचार संपल्यानंतर मतदार संघाबाहेरच्या नेत्यांना थांबता येत नाही असा नियम आहे, त्यामुळे विनोद तावडे जे सांगत आहेत ते खोटे आहे. आर्वी विधानसभेचे भाजपा उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक आहेत, या वानखेडेंच्या गोदामात दारुच्या बाटल्यांचा साठा सापडल्या. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही हा दारु साठा कसा आला? मतदारांना पैसे व दारु वाटून भाजपाचा मते मिळवण्याचा प्रयत्न आहे.” असे आरोपही यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर केले.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -