घरमहाराष्ट्रसंघाचा गणवेश घातल्यानंतर ते व्यक्ती थेट जॉईट सेंक्रेटरी होते, नाना पटोलेंची टीका

संघाचा गणवेश घातल्यानंतर ते व्यक्ती थेट जॉईट सेंक्रेटरी होते, नाना पटोलेंची टीका

Subscribe

बुलढाणा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. नागपूरचा गणवेश घातला की स्पर्धा परीक्षा देण्याची गरज भासत नाही. संघाचा गणवेश घातल्यानंतर ते व्यक्ती थेट जॉईट सेंक्रेटरी होते, असे वक्तव्य नाना पटोलेंनी एका कार्यक्रमात केले. ते बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलत होते.

प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचे असेल, डीएफओ व्हायचे असेल, फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचे असेल तर तुम्हाला युपीएससीच्या परीक्षा आधी पास करायच्या होत्या. आत्ता त्या युपीएससीच्या परीक्षा नाहीत. तर आत्ता नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉईंट सेक्रेटरी होतो अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळत असल्याचा टीक नाना पटोलेंनी केली.

- Advertisement -

राम कदमांचे उत्तर –

हाफ पॅन्टचे एवढंच कोड कौतुक असेल तर नाना पटोले यांनी एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जावे. तेथे गेल्यानंतर नाना पटोले यांना देशप्रेम काय असते, हे कळेल. देशप्रेम काय आहे, समर्पित भाव काय आहे, देशासाठी कसे झिजायचे असते, हे नाना पटोलेंना कळेल. असे राम कदम यांनी म्हटले. ज्या दिवशी संघाच्या शाखेत जाल त्या दिवशी तुम्हीच सांगाल की, आत्तापर्यंत मी चुकीच्या वाटेवर होतो, असेही राम कदम म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -